14 जूलैला 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा(2019 World Cup) अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर पार पडला. हा अंतिम सामना 50-50 षटकांनंतर बरोबरीत सुटला. यामुळे सुपर ओव्हर( Super Over) घेण्यात आली होती. पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी(tie) झाली.
त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा अधिक बाउंड्री मारल्या असल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते.
त्यामुळे आयसीसीच्या बाउंड्री काउंट(boundary count) नियमावर अनेकांनी टीका केली होती. तसेच या नियमाबद्दल मोठी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. पण आता आयसीसीने(ICC) हा नियम काढून टाकला असून त्याचा आयसीसीच्या पुढील कोणत्याही स्पर्धेत उपयोग केला जाणार नाही.
तसेच जर आयसीसीच्या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर घेण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत विजेता मिळत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर पुन्हा पुन्हा घेतली जाईल, असा देखील निर्णय आयसीसीने घेतला आहे.
याबद्दल आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘आयसीसी क्रिकेट समीती आणि मुख्य कार्यकारी समिती(सीईसी)ने खेळातील रोमांच आणि आकर्षण कायम राहण्यासाठी सुपर ओव्हरचा नियम कायम करण्यासाठी मान्यता दिली आहे. वनडे आणि टी20 विश्वचषकाच्या सर्व सामन्यांसाठी याचा उपयोग केला जाईल’
‘आयसीसी स्पर्धांमध्ये साखळी फेरीत जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर सामना बरोबरीत सुटल्याचे मानले जाईल. पण जर उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर तोपर्यंत खेळवली जाईल जोपर्यंत एक संघ प्रतिस्पर्धी संघापेक्षा अधिक धावा करत नाही.’
14 जूलैला 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात(Final) 50-50 षटकांनंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड(England vs New Zealand) संघांनी प्रत्येकी 241 धावा केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 धावाच केल्या. त्यामुळे अखेर बाउंड्री काउंटच्या नियमाचा उपयोग करण्यात आला होता.






