सध्या भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली भलताच फॉर्मात आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेत त्याच्या बॅटने आग ओकली होती. त्यापूर्वीही त्याने त्याचा संघर्ष दाखवला होता. नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने यादरम्यान 6 सामन्यात 98.67च्या सरासरीने एकूण 296 धावा चोपल्या होत्या. अशात आयसीसीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत टी20 विश्वचषकातील विराटची खास झलक पाहायला मिळत आहे.
व्हिडिओची सुरुवात हॅरिस रौफला मारलेल्या षटकाराने
आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “विराट कोहलीकडून यावर्षी सर्वकाही थोडेसे.” आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स आणि 1 हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) याचे टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील काही खास क्षण दिसतात. या व्हिडिओची सुरुवात पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याला मारलेल्या षटकाराने होते. विराटने टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या सामन्यात हॅरिसच्या वरून हा षटकार मारत सामना पलटवला होता.
यानंतर या व्हिडिओत विराटचा झेल पाहायला मिळाला, जो त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात घेतला होता. या सामन्यातही त्याने हा झेल घेत सामन्याचा निकाल संघाच्या बाजूने वळवला होता. यानंतर त्याने याच सराव सामन्यात एका फलंदाजाला धावबादही केल्याचे व्हिडिओत दिसले. विराटने शानदार चपळाईने थ्रो करत ऑस्ट्रेलियन फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता.
झिम्बाब्वेविरुद्ध घेतलेला शानदार झेल
विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराटने एक शानदार झेल घेतला होता. हा झेल घेतल्यानंतर विराटने दिलेली रिऍक्शन पाहण्यासारखी होती. त्याची ही रिऍक्शन आणि झेल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. (icc share a video of cricketer virat kohli form t20 world cup 2022 s special moments watch here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटकडे संधीचं सोनं करण्याची वेळ! बांगलादेशविरुद्ध ‘हे’ दोन विक्रम करताच बनेल जगातील दुसरा खेळाडू
वनिंदू हसरंगाने श्रीलंकेत रचला इतिहास; आरसीबी संघही म्हणत असेल, ‘वाह बेटे मौज कर दी’






