ख्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल ग्राउंडवर रविवारपासून (३ जानेवारी) न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघामध्ये दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना चालू आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही न्यूझीलंड पाकिस्तानवर दबाव कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ अवघ्या १९० धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने २८० पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे.
एकीकडे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटीची ही रोमांचक लढत रंगली असताना, दुसरीकडे सामना पाहायला आलेल्या काही चिमुकल्यांनी प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ख्राइस्टचर्चचे मैदान पूर्णपणे सपाट आहे. तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टेडियमप्रमाणे वेगळी व्यवस्था नाही. त्यामुळे सामना पाहायला आलेले न्यूझीलंडचे क्रिकेट रसिक मैदानाच्या गोल बसून सामन्याचा आनंद लुटताना दिसतात.
अशात काही चिमुकल्यांनी मैदानाच्या एका बाजूला मोकळ्या पटांगणात आपापसात क्रिकेट खेळले. आयसीसीने या चिमुकल्यांचा क्रिकेट खेळतानाचा नेत्रदिपक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत जवळपास ९-१० लहान मुले क्रिकेट खेळण्यात तल्लीन झालेले दिसत आहेत. गल्ली क्रिकेटप्रमाणे एक मुलगा फलंदाजी, एक मुलगा गोलंदाजी तर उर्वरित मुले क्षेत्ररक्षण करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना इतर कोणती वस्तू न मिळाल्याने त्यांनी चक्क एका कचरापेटीला त्यांचे स्टंप बनवले आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका चाहत्याने फलंदाजी करणारा चिमुकला भावी केन विलियम्सन आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका चाहत्याने पाकिस्तानवर निशाना साधत ती सर्व लहान मुले पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा चांगले खेळत असल्याचे सांगितले आहे.
https://twitter.com/ICC/status/1346132280717291521?s=20
https://twitter.com/Gauri_doonite/status/1346132649518088192?s=20
https://twitter.com/aandhi_mahatma/status/1346132649694248960?s=20
न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाची आकडेवारी
न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वपुर्ण सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २९७ धावा केल्या आहेत. यात पाकिस्तानी फलंदाज अझहर अली याच्या सर्वाधिक ९३ धावांचा समावेश आहे. १७२ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या मदतीने त्यानी ही धावसंख्या गाठली आहे. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार मोहम्मद रिझवानने ७१ चेंडूत ६१ धावांची ताबडतोब खेळी केली. इतर फलंदाजांना अर्धशतकी धावसंख्याही करता आली नाही.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना काईल जेमिसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. अवघ्या ६९ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.
त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना १५४ षटकात ६ बाद ६०० धावा केल्या आहेत. सलामीला फलंदाजीसाठी आलेले टॉम लॅथम, टॉम बंडल आणि न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांनी पहिल्या ३० षटकांच्या आतच आपली विकेट गमावली. पण नंतर कर्णधार केन विलियम्सनने हेन्री निकोल्ससह न्यूझीलंडचा डाव सांभाळला.
विलियम्सन ३६४ चेंडूत २८ चौकारांच्या मदतीने २३८ धावा करत बाद झाला. तर निकोल्सनेही १८ चौकारांच्या मदतीने १५७ धावांची तूफानी खेळी केली आहे. डॅरेल मिचेल आणि कायल जेमिसन नाबाद फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! केएल राहुल दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
पहिल्या वनडेची पन्नाशी! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी
बापरे.! समालोचन करत असतानाच ‘ती’ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं, नंतर घडलं असं काही






