न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ख्राइस्टचर्च येथे रविवारपासून (३ जानेवारी) दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले असून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र पाकिस्तान संघ ८४ षटकात २९७ धावांवर गारद झाला. दरम्यान सामना पंच ख्रिस ब्राउन यांनी मैदानावर अतिशय विनोदी कृत्य केले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
झाले असे की, पाकिस्तान संघाचा डाव चालू होता. दरम्यान न्यूझीलंडचे खेळाडू पाकिस्तानच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यासाठी योजना आखत होते. यावेळी पंच ब्राउन आपल्या हॅटवर चेंडू ठेऊन मैदानावर बसले आणि न्यूझीलंडचे खेळाडू डाव पुढे नेण्याचे संकेत देण्याची वाट पाहू लागले. सहसा अशावेळी सामना पंच चेंडू हातात पकडून मैदानावर थांबलेले दिसतात.
आयसीसीने पंच ब्राउन यांच्या या विनोदी कृत्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी या फोटोला योग्य कॅप्शन सूचवा, असे लिहिले आहे. त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तर, “सामना पंचही पाकिस्तानच्या वाईट फलंदाजीला पाहून कंटाळल्याचे दिसत आहेत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तर एका चाहत्याने “याच मैदानावर २०२०च्या सुरुवातीला न्यूझीलंड संघ २४४ धावांवर सर्वबाद झाला होता. यावेळी आम्ही बाबर आझम नसताना २९७ धावा केल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/ICC/status/1345800846630559744?s=20
https://twitter.com/Eat_Cricket/status/1345801733587562497?s=20
https://twitter.com/Itsammar2001/status/1345802692946489345?s=20
https://twitter.com/Gramyarts/status/1345920410202865665
https://twitter.com/NA__SR__EEN3/status/1345804219807199232
https://twitter.com/spirit04cricket/status/1345851105834463233
न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाची आकडेवारी
न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वपुर्ण सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २९७ धावा केल्या आहेत. यात पाकिस्तानी फलंदाज अझहर अली याच्या सर्वाधिक ९३ धावांचा समावेश आहे. १७२ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या मदतीने त्यानी ही धावसंख्या गाठली आहे. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार मोहम्मद रिझवानने ७१ चेंडूत ६१ धावांची ताबडतोब खेळी केली. इतर फलंदाजांना अर्धशतकी धावसंख्याही करता आली नाही.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना काईल जेमिसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. अवघ्या ६९ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.
त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३ विकेट्स गमावल्या आहेत. यात टॉम लॅथम, टॉम बंडल आणि रॉस टेलर यांचा समावेश आहे. पण नंतर दुसऱ्या दिवसाखेर कर्णधार केन विलियम्सनने हेन्री निकोल्ससह न्यूझीलंडचा डाव सांभाळला. केन विलियम्सन नाबाद ११२ धावांवर खेळत आहे. तर हेन्री निकोल्सनेही त्याला साथ देत ८९ धावांचा आकडा गाठला आहे. या दोघांनी दुसऱ्या दिवसाखेर २१५ धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विलियम्सनचा शतकी तडाखा! स्टिफन फ्लेमिंगच्या ‘या’ विक्रमालाही दिला धक्का
केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे
“दर्शक स्टेडियममध्ये आणि आम्ही मात्र क्वारंटाइन, ही कसली वागणूक?” टीम इंडियाचा आरोप






