कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सगळ्यात अवघड प्रकार मानला जातो. पाच दिवस चालणाऱ्या सामन्यात क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा खऱ्या अर्थाने कस लागतो. केवळ कौशल्यच नाही तर संयम आणि सातत्याची देखील कसोटी क्रिकेटमध्ये परीक्षा होते. त्यामुळेच आजही वनडे आणि टी२० क्रिकेट जगभरात लोकप्रिय असले, तरी क्रिकेटपटूंचे ध्येय देशाकडून कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व करण्याचे असते.
आजही विद्यमान क्रिकेटमधील विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन हे दिग्गज खेळाडू कसोटी क्रिकेट अतिशय गांभीर्याने खेळतांना दिसून येतात. कसोटी क्रिकेट हा त्यांच्यासह आजही अनेक क्रिकेटपटूंचा आवडता प्रकार आहे. सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने न्यूझीलंड आणि भारताच्या क्रिकेटपटूंनी याच गोष्टीचा उलगडा केला. आयसीसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी यामागील कारण देखील सांगितले आहे.
ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ
सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात कसोटी क्रिकेटचे सर्वोच्च जेतेपद पटकावण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. याच अंतिम सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघातील खेळाडूंना एक प्रश्न विचारला. कसोटी क्रिकेटबाबत त्यांना सर्वाधिक आवडणारी गोष्ट कोणती, असा हा प्रश्न होती.
दोन्ही संघातील खेळाडूंनी याची दिलखुलास उत्तर दिली. काही खेळाडूंनी अखेरच्या दिवसापर्यंत ताणली जाणारी निकालाची उत्सुकता आणि हार, जीत किंवा अनिर्णीत असे तिन्ही प्रकाराचे निकाल लागण्याची शक्यता, ही आवडती गोष्ट असल्याचे सांगितले. तर काहींनी मानसिक आणि शारीरिक आव्हान, करावी लागणारी कठोर मेहनत या गोष्टी आवडत असल्याचे नमूद केले. पाच दिवसांसाठी लागणारे सातत्य, ही देखील यातील आवडती परंतु कठीण गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
"It's a lot of hard work, it tests everything."
The #WTC21 finalists reveal what their favourite thing about Test cricket is👇 pic.twitter.com/ShYyO4ipv2
— ICC (@ICC) June 21, 2021
अंतिम सामना रंगतदार अवस्थेत
दरम्यान, या दोन संघांमधील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतांना २१७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात तिसर्या दिवसअखेर न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा संघ यात काहीसा पुढे असला तरी भारतीय संघाला पुनरागमन करण्याची अद्यापही संधी आहे. त्यामुळे पावसाने व्यत्यय आणला नाही, तर चाहत्यांना दर्जेदार क्रिकेट पुढील तीन दिवस पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या:
पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान
दु:खद! ‘द ग्रेट खली’च्या जिवलग व्यक्तीचे निधन, दीर्घ आजारामुळे मालवली प्राणज्योत
‘मूड स्विंग झाला, पण चेंडू नाही’; टिम इंडियाच्या सुमार गोलंदाजीवर माजी क्रिकेटर नाराज