आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे संचालन करणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आपल्या फ्युचर टूर प्रोग्रामची लवकरच घोषणा करेल. पुढील चार वर्षात होणाऱ्या प्रमुख स्पर्धा तसेच मालिकांबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येतील.या बैठकीत भारतीय क्रिकेट आणि आयपीएलप्रेमींना आनंद देणारी एक बातमी जाहीर केली जाऊ शकते.
आयसीसीची २०२३ ते २०२७ या कालावधीसाठीच्या फ्युचर टूर प्रोग्रामसाठी बर्मिंघम येथे बैठक होणार आहे. २५ आणि २६ जुलै रोजी ही बैठक संपन्न होईल. या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, आयसीसीच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये आयपीएलला अडीच महिन्यांची विंडो देण्याबाबत घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी हा कालावधी फक्त दोन महिन्यांचा होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी काही दिवसापूर्वीच यानंतर आयपीएल अडीच महिन्यांची होईल असे सुतोवाच केले होते. तसेच, दरवर्षी १० सामने अधिक खेळवण्याबाबतही त्यांनी म्हटलेले.
इतर लीगलाही होणार फायदा
या एफटीपीमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या देशांनाही फायदा मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग, पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग, इंग्लंडमध्ये द हंड्रेड आणि बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रीमियर लीग खेळली जाते. या स्पर्धांवेळी त्या देशांची कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका नसेल. फक्त २०२४ पीएसएलवेळी पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होऊ शकते.
आयसीसीच्या मोठ्या स्पर्धाही होणार
नव्या प्रोग्राममध्ये दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, दोन टी२० वर्ल्डकप व वनडे वर्ल्डकप खेळला जाईल. त्यामध्ये पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी आहे. २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला दिले गेले. १९९६ विश्वचषकानंतर पाकिस्तान प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करेल. भारतात २०२३ वनडे विश्वचषक खेळला जाईल. परंतु, यादरम्यान सर्व संघांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीला एकटे फिरताना पाहून चाहत्यांनी केले ‘हे’ कृत्य, लंडनमधील व्हिडिओ होतोय व्हायरल
आफ्रिदीने श्रीलंकन कर्णधाराच्या उडवल्या दांड्या, बाद झाल्यावर स्टम्पकडे पाहतच राहिला शेवटच्या वनडेत कशी असणार मॅंचेस्टरची खेळपट्टी? कोणत्या संघाला होणार फायदा? वाचा सर्वकाही





