बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोरफुल इस्लामला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चा भंग केल्याबद्दल अधिकृत फटकारण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ढाका येथे झालेल्या तिसऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यजमानांनी शुक्रवारी १० धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात शोरिफुल इस्लामने केलेली एक चूक त्याला महागात पडली आहे.
शोरफुल आयसीसीच्या खेळाडूंच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. जे भाषा, कृती किंवा हावभाव यांच्याशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त, शोरेफुलच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा पहिला गुन्हा होता.
आयसीसीने शनिवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १८ व्या षटकात घडली. मिशेल मार्श बाद झाल्यावर फलंदाजाच्या खूप जवळ जाऊन आनंद साजरा केला गेला, ज्यामुळे मार्शकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकते.”
आयसीसीने म्हटले की, “शोरफुलने गुन्हा कबूल केला. त्यानंतर औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. मैदानावरील पंच शरफुद्दौला सैकत आणि गाजी सोहेल, तिसरे पंच मसूदूर रहमान आणि चौथा अधिकारी तन्वीर अहमद यांनी शोरिफुलवर हे आरोप लावले होते.”
बांगलादेशने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने शनिवारी मालिकेतील पहिला विजय नोंदवला. चौथ्या टी -२० आंतरराष्ट्रीयमध्ये बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ बाद १०४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने ६ चेंडू शिल्लक असताना ३ खेळाडू राखून विजय मिळवला. या सामन्यात डेन ख्रिश्चनने १५ चेंडूत ३९ धावा केल्या. साकिब अल हसनच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या –
कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर चहलने पत्नी अन् सासूबाईसोबत लावले ठुमके; व्हिडिओ तुफान व्हायरल
नीरजनं ‘गोल्ड’, तर मिराबाईनं पटकावलं ‘सिल्व्हर’; पाहा कोणाला मिळालं कोणतं पदक?