वेस्ट इंडिज व यूएसए तेथे झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत सह-यजमान असलेल्या युएसए संघाने आपल्या कामगिरीने क्रिकेटविश्वात खळबळ माजवली होती. प्रथमच विश्वचषक खेळणाऱ्या यूएसए संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सुपर 8 पर्यंत मजल मारलेली. यानंतर संघाचे सर्वत्र कौतुक झाले. परंतु आता या संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने निलंबनाची कारवाई केली आहे.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये सह-यजमान असताना यूएसएने आपले टी20 विश्वचषक पदार्पण गाजवले. साखळी फेरीत शेजारी कॅनडा संघाला हरवून त्यांनी विजयी सलामी दिली. त्यानंतर मात्र त्यांनी विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर केला. टी20 विश्वचषक 2009 चे विजेते आणि 2022 टी20 विश्वचषकाचे उपविजेते पाकिस्तानला पराभूत करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. पुढे जाऊन विजेत्या ठरलेल्या भारतीय संघाविरुद्ध देखील त्यांनी एक वेळ सामन्यावर वर्चस्व गाजवले होते. यानंतर आयर्लंडविरूद्ध सामना रद्द झाला. त्या सामन्यातील एक गुण मिळवून त्यांनी सुपर 8 फेरीत प्रवेश केला होता.
नुकतीच कोलंबो येथे चार दिवस आयसीसीची वार्षिक बैठक पार पडली. यामध्ये युएसए क्रिकेट व चिली क्रिकेट संघांना आयसीसीकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच या संघांना पुढील बारा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांना आपल्या संघटनेत असलेल्या अनियमितता दूर कराव्या लागतील.
युएसए क्रिकेट बोर्डाविषयी बोलायचे झाल्यास, त्यांना अद्यापही पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नाही. यूएसए व चिली या दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डाने अद्याप आपल्या देशाच्या ऑलिंपिक व पॅरालिंपिक असोसिएशनकडून मान्यता घेतलेली नाही. पुढील 12 महिन्यात या दोन्ही देशांना या त्रुटी दूर कराव्या लागतील.
युएसए क्रिकेट संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्याने पाय रोवत आहे. विश्वचषकातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. आता मी विश्वचषकात त्यांनी आपल्या चुका दुरुस्त न केल्यास त्यांना विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. हा विश्वचषक भारत व श्रीलंका येथे आयोजित करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पाहा, अशी करतात फलंदाजी! गंभीरच्या भारताच्या स्टार फलंदाजाला टिप्स; सराव सत्राचा VIDEO व्हायरल
ICC T20 RANKING: भारतीय महिलांनी आयसीसी टी20 क्रमवारीत घेतली झेप
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी स्टार क्रिकेटपटू बाबा बागेश्वर धामच्या दर्शनाला, पाया पडून घेतला आशिर्वाद