---Advertisement---

पुण्याचे पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांवर आयसीसीची निलंबनाची कारवाई

On: मंगळवार, मार्च 6, 2018 7:25 PM
---Advertisement---

आज आयसीसीने पुण्याचे पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांवर सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्यात इंडिया टुडेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या वनडे सामन्याआधी इंडिया टुडेने साळगावकरांच्या विरोधात वृत्त दिले होते. या वृत्तानुसार पुण्याच्या एमसीए स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर हे ‘खेळपट्टी कशी असेल’ हे ऑन कॅमेरा सांगताना दिसले होते तर काही लोक खेळपट्टीला इजा पोहचेल असे करताना दिसले होते.

पण तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याने त्यांच्यावर एमसीएने तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण यासाठी त्यांच्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते.

आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे व्यवस्थापक अॅलेक्स मार्शल म्हणाले, ” इंडिया टुडेने केलेल्या आरोपांवर आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या पुराव्यांवर आम्ही तपास केला.”

तसेच त्यांनी असेही सांगितले, ते समाधानी आहेत की इंडिया टुडेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर साळगावकरांकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. पण ते आयसीसीशी बांधील असल्याने त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी समितीने २.४.४ च्या कोड अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, ” साळगावकरांनी २५ ऑक्टोबर२०१७ ला हा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मान्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर सहा महिन्यांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण एमसीएने त्याचवेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे ते २४ एप्रिल २०१८ पासून त्यांच्या कामावर पुन्हा रुजू होऊ शकतात.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment