ऑस्ट्रेलियात सुरू असलेला पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) अंतिम टप्प्यात आला आहे. यामध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना गुरूवारी (10 नोव्हेंबर) ऍडलेड ओव्हलवर खेळला जाणार आहे, तर पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात सिडनीमध्ये खेळला जात आहे. त्यातच आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये दोन्ही संघाच्या काहींना मोठा फायदा झाला आहे. तत्पूर्वी, जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने आंतरराष्ट्रीय टी20 फलंदाजाच्या क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले आहे.
सूर्यकुमार यादव याच्याबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांना क्रमवारीत फायदा झाला आहे. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टी20 विश्वचषक 2022च्या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे. यामुळे त्याने आयसीसी टी20 क्रमवारीत 11वे स्थान कायम राखले आहे. अर्शदीपला एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने गोलंदाजीत 23वे स्थान गाठले आहे.
या स्पर्धेत अर्शदीपने त्याच्या गोलंदाजींंने चाहत्यांना भूरळ घातली आहे. त्याने पहिलाच टी20 विश्वचषक खेळताना 5 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर भारताचा सलामीवीर राहुल यालाही एका स्थानाचा लाभ झाला असून तो आता 16व्या स्थानावर आहे. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो 14वरून 13व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 18व्या स्थानावर कायम आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा पहिल्या स्थानावर आहे, तर भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याला 5 स्थानांचा फायदा झाला. त्याने थेट 13व्या स्थानावर उडी घेतली आहे. गोलंदाजीत भारताचा एकही खळाडू पहिल्या दहामध्ये नाही. भुवनेश्वर कुमार 12व्या स्थानावर कायम आहे, तर इंग्लंडचा सॅम करन (Sam Curran) सातव्या स्थानावर आहे.
या विश्वचषकानंतर कोणता भारतीय खेळाडू आपले स्थान कायम राखेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासाठी खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे हे काय, ऍडलेड ओव्हलच्या सेमीफायनलमध्ये नाणेफेक ‘हरण्यासाठी’ रोहित-जोसमध्ये चढाओढ! कारणच चकित करणारे
स्वतः एबी डिविलियर्सने मान्य केली सूर्यकुमारची गुणवत्ता, अजून चांगल्या प्रदर्शनसाठी दिला ‘हा’ सल्ला