बुधवारी (दि. 26 एप्रिल) आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर झाली. या क्रमवारीत पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान याला मोठा फायदा झाला आहे. रिझवानला न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या टी20 मालिकेत शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले. तो यासोबतच 13 गुण मिळवत आणि 100पेक्षा कमी रेटिंग गुणांच्या अंतरासह सूर्यकुमार यादव याच्या जवळ पोहोचला आहे.
रिझवानने मिळवले 13 गुण
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा 906 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तसेच, मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 811 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यालाही या क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याला 13 अतिरिक्त गुण मिळाले आहेत. आता तो 756 गुणांसह क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. बाबरने न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले होते. तसेच, रिझवानने अंतिम सामन्यात नाबाद 98 धावांची खेळी केली होती. त्याने एकूण 162 धावांच्या खेळीसह पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मालिका संपवली.
🙌 Mohammad Rizwan rewarded for excellent form
🌟 Afghanistan spinner remains on top
📈 Mark Chapman moves up 45 placesLatest changes in the @MRFWorldwide ICC Men’s T20I Player Rankings ⬇️https://t.co/T8bTGAIm3m
— ICC (@ICC) April 27, 2023
मार्क चॅपमॅनलाही झाला फायदा
टी20 क्रमवारीत न्यूझीलंडचा फलंदाज आणि अंतिम सामन्यात शतक ठोकून सामना जिंकवणारा मार्क चॅपमॅन याने मोठी झेप घेतली. त्याने 45 स्थान वर येऊन कारकीर्दीतील सर्वोत्तम 35वे स्थान पटकावले आहे. तसेच, पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमद यालाही 6 स्थानांचा फायदा झाला असून तो 38व्या स्थानी आला आहे. हे त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान आहे. तसेच, तो पाकिस्तानचा तिसरा विस्फोटक फलंदाज आहे.
इमाद वसीमचीही भरारी
या मालिकेदरम्यान अष्टपैलू इमाद वसीम यानेही वादळी प्रदर्शन केले. इमादने अंतिम सामन्यात 31 धावांची खेळी केली. तसेच, मालिकेत एकूण 8 विकेट्स घेतल्या. गोलंदाजांच्या यादीत, इमादने अव्वल 100मध्ये उडी मारली. तसेच, टी20 अष्टपैलूंच्या यादीत 44 स्थानांची झेप घेत 24वे स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान हा टी20 गोलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे, तर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी आहे. (icc t20 ranking mohammad rizwan closes to suryakumar yadav mark chapman got advantage)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! WTC फायनलमध्ये कोरोनाची चिंता मिटली, पॉझिटिव्ह असूनही खेळू शकणार खेळाडू?
बाप क्रिकेटर! चक्रवर्तीने नवजात मुलगा अन् पत्नीला समर्पित केला ‘सामनावीर’ पुरस्कार; म्हणाला, ‘आता मी…’