आयसीसीने (ICC) बुधवारी (१६ फेब्रुवारी) जाहीर केलेल्या खेळाडूंच्या ताज्या टी-२० क्रमवारीत (t20 ranking) भारतीय संघाचे केएल राहुल (kl rahul) आणि विराट कोहली (virat kohli) पहिल्या १० मध्ये कायम आहेत. या दोघांव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज पहिल्या १० मध्ये नाहीय. गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार २१ व्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर भारतासाठी टी-२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज आहे. संघांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. टी-२० मालिकेत भारताने वेस्ट इंडीजला जर क्लीन स्पीप केले, तर संघ पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.
टी-२० क्रमवारीत सर्वात मोठा बदल जोश हेजलवुडच्या रूपात पाहायला मिळाला आहे. त्याने चार स्थानांची झेप घेत गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक गाठला आहे. त्याव्यतिरिक्त यूएईचा रोहन मुश्ताफा पाच स्थानांच्या फायद्यासह अष्टपैलूंच्या क्रमांकावर सातवा क्रमांकावर पोहोचला आहे.
टी-२० फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी सलामीवीर मोहम्मद रिजवान आहे. दक्षिण अफ्रिकेचा एडेन मार्करम तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आणि इंग्लंडचा डेविड मलान पाचव्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंचच्या रूपात फक्त एक बदल पाहायला मिळाल. फिंच एका स्थानाने खाली घसरून सातव्या क्रमांकावार पोहोचला आहे. डेविड कॉन्वे सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या आठवड्यात गोलंदाजांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. दक्षिण अफ्रिकेचा तबरेज शम्सी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे. तसेच श्रीलंकेविरुद्ध अप्रतिम प्रदर्शन करणारे जोश हेजलवुड चार स्थानांच्या फायद्यासह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा दोन स्थानांच्या नुकसानासह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी-२० गोलंदाजांमध्ये याव्यतिरिक्त कोणताही बदल नाहीय.
टी-२० अष्टपैलूंमध्ये या आठवड्यात फक्त एक बदल पाहायला मिळाला. यूएईच्या रोहन मुश्तफाने पाच स्थानांची झेप घेत, सातवा क्रमांक गाठला आहे. अफगाणिस्तानचे मोहम्मद नबी पहिल्या आणि बांगलादेशचे शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. नामीबियाचे के जेजे स्मिथ आठव्या आणि ओमानचा जीशान मसूद १० व्या क्रमांकावर कायम आहेत. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा अष्टपैलूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर कायम आहे.
महत्वाच्या बातम्या –
मेगा लिलावानंतर गंभीरने ‘त्या’ खेळाडूला म्हटले ‘फायदेशीर डील’
आयपीएल २०२२ खरंच वेगळं असणार! ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंशिवाय खेळला जाणार यंदाचा हंगाम
INDvsWI: पहिल्या टी२०मध्ये रोहितने जिंकला टॉस, भारताकडून बिश्नोईचे पदार्पण; पाहा कसे आहेत दोन्ही संघ