---Advertisement---

टी२० क्रमवारी: विराटने घेतली चौथ्या स्थानी झेप, रोहित टॉप-२० मध्येही नाही

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 11:38 PM
Virat Kohli and Rohit Sharma
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी -२० मालिका संपल्यानंतर, जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने मोठी झेप घेतली आहे आहे. डी कॉकने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठत आठवे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका ३-० ने जिंकली होती.

भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तर केएल राहुल सहाव्या स्थानावर कायम आहे. हे दोन फलंदाज भारताकडून अव्वल दहा टी-२० फलंदाजांच्या यादीत समाविष्ट आहेत.

अव्वल टी-२० गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी पहिल्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेचा वनिंदू डी सिल्वा दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर राशीद खान आहे तर चौथ्या स्थानावर इंग्लडचा आदिल राशीद आहे.

इंग्लडचा डेव्हिड मलान टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर, पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने पाचव्या क्रमांकावरुन चौथे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. गोलंदाजीत पहिल्या दहा जणात एकही भारतीयाला स्थान मिळवता आलेले नाही.

ताज्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्मा २१ व्या स्थानावर पोहोचला आहे. शिखर धवन ३० व्या स्थानावर आहे. विराट, केएल राहुल, रोहित आणि धवन हे चार भारतीय फलंदाज अव्वल तीस फलंदाजांमध्ये समाविष्ट आहेत. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतासाठी सर्वोत्तम क्रमवारी भुवनेश्वर कुमारने मिळवली आहे, जो १२ व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर १८ व्या क्रमांकावर, तर युजवेंद्र चहल २५ व्या क्रमांकावर आहे. हे तिघेच भारतीय पहिल्या ३० गोलंदाजांमध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

एक, दोन नव्हे, तर तब्बल ५ वेळेस हॅट्रिकचा कारनामा, मलिंगाचे ‘हे’ मोठे विक्रम तोडणे अशक्यच

चहल म्हणतोय, ‘मला आरसीबीमधून निवृत्त व्हायचंय आणि माझं स्वप्न असेल की…’

हनुमा विहारीने सोडली आंध्र प्रदेशची साथ, आगामी हंगामात करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---