---Advertisement---

नव्या टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फायदा, तब्बल दहा स्थानांची उडी घेत चहल पोहोचला ‘या’ क्रमांकावर

On: बुधवार, जुलै 28, 2021 8:53 PM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ३८ धावांनी आपल्या नावे केला. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची वैयक्तिक टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंना चांगला फायदा झालेला दिसून आला.

या भारतीय खेळाडूंना झाला फायदा
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंकेला एकतर्फी सामन्यात धूळ चारली. या सामन्यात सामनावीर ठरलेला संघाचा उपकर्णधार व अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याला गोलंदाजी क्रमवारीत फायदा झाला असून, तो १६ स्थानी आला आहे. भुवनेश्वरने या सामन्यात २२ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

या मालिकेतून पुनरागमन करणारा लेगस्पिनर युजवेंद्र चहल यालादेखील तब्बल १० स्थानांचा फायदा झाला व तो २१ व्या क्रमांकावर पोहोचला. श्रीलंकेचा लेगस्पिनर वनिंदू हसरंगा याला देखील पहिल्या सामन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले. तो आता गोलंदाजांच्या टी२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

इतर भारतीय खेळाडूंना नाही झाले नुकसान
सध्या भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी असल्याने शिखर धवनच्या नेतृत्वातील दुय्यम संघ श्रीलंकेत खेळत आहे. प्रमुख संघाचा फलंदाज केएल राहुल व कर्णधार विराट कोहली यांना या क्रमवारीमध्ये कोणतेही नुकसान सोसावे लागले नाही. ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर कायम आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा या मालिकेत सहभागी न झाल्याने १४ व्या क्रमांकावर घसरला. तर, शिखर धवन या क्रमवारीत २९ व्या स्थानी पोहचला. शिखरने पहिल्या सामन्यात ४६ धावांची दमदार खेळी केली होती.

बुधवारी होणार दुसरा सामना
श्रीलंका आणि भारत यांच्यातील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार होता. मात्र, भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने हा सामना २८ जुलै रोजी खेळला जाईल. मालिकेतील अखेरचा सामना २९ जुलै रोजी खेळविण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने ‘या’बाबतीत मोडले सारे विक्रम

‘मग बीसीसीआय विराटला बाहेर बसणार का?’ ऑलिम्पिक खेळाडूंवर टीका करणाऱ्यांवर भडकला वीरधवल खाडे

पुन्हा एकदा मंधनाची तुफानी फलंदाजी, १५६ च्या स्ट्राईक रेटने धावा करत जिंकून दिला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---