आंतरराष्ट्रीय क्रिकेट कांउन्सिलद्वारा (आयसीसी) आयोजित टी२० विश्वचषक २०२१ ची जोरदार तयारी सुरू आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी संघात टी२० विश्वचषकाचा पहिला सामना होणार आहे. याच दिवशी बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड हे संघदेखील आमनेसामने येतील. भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील उद्घाटनाचा सामना २४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
अवघ्या एका महिन्यावर आलेल्या या स्पर्धेच्या अनुषंगाने क्रिकेट संघांनी तयारीही सुरू केली आहे. आयसीसीने सर्व संघांना १० सप्टेंबरपर्यंत टी२० विश्वचषकासाठी त्यांचे संघ घोषित करण्यास सांगितले होते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १६ संघांनी टी२० विश्वचषकासाठी आपापले संघ जाहीर केले आहेत. याच सर्व घोषित संघांची यादी आम्ही येथे दिली आहे.
टी२० विश्वचषक २०२१ साठी असे आहेत सर्व १६ संघ-
Standby players – Shreyas Iyer, Shardul Thakur, Deepak Chahar.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
Our Australian men's squad for the ICC Men’s #T20WorldCup! 🇦🇺
More from Chair of Selectors, George Bailey: https://t.co/CAQZ4BoSH5 pic.twitter.com/aqGDXZu0t9
— Cricket Australia (@CricketAus) August 19, 2021
टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ :
ऍरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिंस (उपकर्णधार), जोश हेजलवुड, जोश इंग्लिश, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर, ऍडम झम्पा
Afghanistan National Cricket Team Squad for the World T20 Cup 2021. pic.twitter.com/exlMQ10EQx
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 9, 2021
टी२० विश्वचषकासाठी अफगानिस्तानचा क्रिकेट संघ :
राशिद खान, रहमानुल्ला गुरबाज, हजरतुल्लाह जजई, उस्मान गनी, असगर अफगान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जदरान, हशमतुल्ला शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नैब, नवीन उल हक, हामिद हसन, शरफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शापूर जादरान, कैस अहमद
राखीव खेळाडू : अफसर जजई, फरीद अहमद मलिक
ICC @T20WorldCup 2021
Bangladesh Squad#BCB pic.twitter.com/iMTeyoM5sD
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 9, 2021
टी२० विश्वचषकासाठी बांगलादेश संघ :
महमुदुल्लाह रियाध (कर्णधार), मोहम्मद नईम शेख, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ हुसैन ध्रुबो, नुरुल हसन सोहन, माहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, शोरफुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, शमीम हुसेन
राखीव खेळाडू : रुबल हुसेन, अमीनुल इस्लाम बिप्लोबी
Happy with our @T20WorldCup squad? 🏏 🌎 🏆
More 📝 https://t.co/hzCrlFFSzj pic.twitter.com/3L7ee8WJTq
— England Cricket (@englandcricket) September 9, 2021
टी२० विश्वचषकासाठी इंग्लंड संघ :
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
राखीव खेळाडू : टॉम कुरन, लियाम डॉसन, जेम्स व्हिन्स.
Asif and Khushdil return for ICC Men's T20 World Cup 2021
More details ➡️ https://t.co/vStLml8yKw#PAKvNZ | #PAKvENG | #T20WorldCup pic.twitter.com/9samGbJgDJ
— PCB Media (@TheRealPCBMedia) September 6, 2021
टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ :
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, आसिफ अली, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, शोएब मकसूद, आजम खान, इमाद वसीम, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहदाब खान, हसन अली, हारिस राऊफ, मोहम्मद हसनैन, शाहिद आफ्रिदी.
राखीव खेळाडू : फखर जमान, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी
CWI announces squad for the ICC T20 World Cup 2021🏆 #MissionMaroon #T20WorldCup
World Cup Squad details⬇️https://t.co/qoNah4GTZS pic.twitter.com/IYGQNBobgi
— Windies Cricket (@windiescricket) September 9, 2021
टी२० विश्वचषकासाठी वेस्टइंडीज संघ :
कीरोन पोलार्ड (कर्णधार) , निकोलस पूरन, फॅबियन एलन, ड्वेन ब्रावो, रोस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, शिमरोन हेटमायर, एविन लुईस, ओबेड मैककॉय, रवि रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमंस, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श
राखीव खेळाडू : डॅरेन ब्रावो, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, अकील होसेन
🇿🇦 Your 18-man extended #T20World #Proteas squad heading to the ICC Men's #T20WorldCup!#BePartOfIt pic.twitter.com/KD9DZPWQOe
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 9, 2021
टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघ :
टेंबा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डीकॉक, जॉन फॉर्टुइन, रिजा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, म्यूल्डर, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किए, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तब्राईज शम्सी, रास्सी वॅन दर दुसेन.
राखीव खेळाडू : जॉर्ज लिंड, एंडिले फेहलुक्वायो, लिजाड विलियम्स.
Your 🇱🇰 squad for the ICC Men's #T20WorldCup 2021! 👊https://t.co/xQbf0kgr6X pic.twitter.com/8Hoqbx10Vy
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 12, 2021
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप-कर्णधार), कुशल परेरा, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, बी राजापक्षा, सी असालंगा, वानिंदु हसरंगा, कामिंडु मेंडिस, सी. करूणारत्ने, एन. प्रदीप, दुश्मंथा चामीरा, पी. जयाविक्रामा, एल. माडुशांका, एम थीकशाना.
राखीव खेळाडू : लाहिरू कुमारा, बिनुरू फर्नांडो, अकिला धनंजय, पुलिना थरंगा
Plenty of news from @Blackcaps today, starting with their squad for the @T20WorldCup and #INDvNZ T20Is. #T20WorldCup 🧵 pic.twitter.com/ruJ74um0Hg
— ICC (@ICC) August 9, 2021
टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ :
केन विलियम्सन (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टिरक्षक) ईश सोधी, टीम साउथी, ऍडम मिल्ले (खेळाडू जखमी झाल्यास)
टी२० विश्वचषकासाठी नेदरलँड संघ :
पीटर सीलर (कर्णधार), कोलिन एकरमान, फिलिपी बोइसवैन, बेन कूपर, बास डिलीड, स्काट एडवार्ड्स, ब्रैंडन ग्लोवर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मीबर्ग, मैक ओडाउड, रयान टेन डजचेट, लोगन वैन बीक, टिम वैन डर गटन, रोइलोफ वैन डर मेर्व आणि पाल वैन मीकरन
राखीव खेळाडू : एस स्नेटर आणि टी विसी
टी२० विश्वचषकासाठी आयर्लंड संघ :
एंड्रयू बालबर्नी (कर्णधार), मार्क एडेर, कुर्टिस कैम्फेर, गेरेथ डेलैनी, जार्ज डाकरेल, शेन गेटकैट, ग्राहम केनेडी, जोश लिटिल, एंड्रयू मैकब्रायन, बैरी मैककार्ती, केविन ओब्रायन, नील रोक, सिमी सिंह, पाल स्ट्रिलिंग, हैरी टेक्टर, लोरकैन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग
टी२० विश्वचषकासाठी नामिबिया संघ :
गेरहार्ड इरासमस (कर्णधार), स्टीफन बार्ड, कार्ल ब्रिकेनस्टाक, मिचउ डुप्रीज, जैन फ्रीलिंक, जैन ग्रीन, निकोल लोफी-इटान, बेरनार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, जेजे स्मिट, रुबेन त्रुम्पेलमान, माइकल वैन लिंगेन, डेविड वीज, क्रेग विलियम्स, पिकी या फ्रांस
राखीव खेळाडू : मॉरीशस न्गुपिटा
टी२० विश्वचषकासाठी ओमान संघ :
जीशान मकसूद (कर्णधार), आकिब इल्यास, जतिंदर सिंह, खवर अली, मोहम्मद नदीम, अयान खान, सूरज कुमार, संदीप गोड, नेस्तर धांबा, कलीमुल्लाह, बिलाल खान, नसीम खुशी, सुफयान महमूद, फय्याज बट आणि खुर्रम खान
टी२० विश्वचषकासाठी पापुआ न्यू गिनी संघ :
असद वाला (कर्णधार), चार्ल्स एमिनी, लेगा सिएका, नोरमैन वनुआ, नोसैना पोकाना, किपलिंग डोरिजा, टोनी उरा, हिरी हिरी, गोडी टोका, सेसे बाउ, डामियन रावू, कबुआ वागी-मोरिया, सिमोन अताई, जेसन किला, चाड सोपर आणि जैक गार्डनर
टी२० विश्वचषकासाठी स्कॉटलँड संघ :
काइल कोइटजर (कर्णधार), रिचर्ड बेरिंगटन (उपकर्णधार), डीलैन बज, मैथ्यू क्रोस (यष्टीरक्षक), जोश दावी, एलासडेर एवांस, क्रिस ग्रीव्स, ओली हेयर्स, माइकल लीस्क, कैलम मैकलियोड, जार्ज मुनसे, साफयान शरीफ, क्रिस सोल, हम्जा ताहिर, क्रेग वैलेस (यष्टीरक्षक), मार्क वाट आणि ब्रैड व्हील
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ३५ वर्षीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
तब्बल २४ हजार धावा आणि ४०० गडी बाद करणारा ‘हा’ क्रिकेटर टी२० विश्वचषकानंतर घेणार निवृत्ती