यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 36वा सामना पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (16 जून) रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा, सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड येथे रंगणार आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड संघ सुपर 8च्या क्वालिफाय रेसमधून बाहेर पडले आहे. परंतु दोन्ही संघ सन्मानासाठी आज भिडत आहेत. दोन्ही संघांचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील आणि साखळीफेरीतील शेवटचा सामना आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सॅम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद अमीर, अब्बास आफ्रिदी
आयर्लंड- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट
पाकिस्तान यंदाच्या टी20 विश्वचषकात 3 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांचा पहिला सामना अमेरिका विरुद्ध होता. परंतु या सामन्यात त्यांना सुपर ओव्हरमध्ये निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरा सामना भारताविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली. तिसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं पुनरागमन करत कॅनडाचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केला. परंतु त्यांच्यासाठी सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
आयर्लंड संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात 3 सामने खेळला आहे. त्यामध्ये ते एकही विजय मिळवू शकले नाहीत. 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाला आहे. आयर्लंडसाठी सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याचं सर्व दरवाजे बंद झाले आहेत. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात पहिला विजय मिळवण्यासाठी ते सज्ज असतील.
पाकिस्तान आणि आयर्लंड संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले नाहीत. त्यामध्ये पाकिस्ताननं 3 सामन्यात वर्चस्व गाजवलं आहे. तर आयर्लंड संघ एक सामना जिंकण्यात यशस्वी राहिला आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान आणि आयर्लंड संघ ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहेत. ग्रुप-अ मधून भारतीय संघानं 6 गुणांसहित सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आहे आणि गुणतालिकेत ते शीर्ष स्थानी आहेत. ग्रुप-अ मधून सुपर 8 साठी क्वालिफाय करणारा अमेरिका दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि आयर्लंड संघाच्या हाती केवळ निराशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“वादळ येण्यापूर्वीची शांतता…” कोहलीच्या फाॅर्मबद्दल ‘या’ दिग्गज खेळाडूनं दिली भन्नाट प्रतिक्रिया
कोण आहे सौरभ नेत्रावलकरची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला?
स्मृती मानधनाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण!