यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 49वा सामना (23 जून) रोजी अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेला. बार्बाडोसच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने होते. सुपर 8 ग्रुप-2 मधील ही लढत होती. कर्णधार जोस बटलरच्या (Jos Buttler) झंझावाती अर्धशतकासह इंग्लंडनं 10 गडी राखून अमेरिकेचा पराभव केला.
अमेरिकेनं दिलेल्या 116 धावांचा पाठलाग करताना कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि फिलिप सॉल्ट (Philip Salt) यांच्या नाबाद 117 च्या भागीदारीनं इंग्लंडनं हा सामना जिंकला. कर्णधार जोस बटलरनं नाबाद 38 चेंडूत सर्वाधिक 83 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 6 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार ठोकले. यादरम्यान त्याचं स्ट्राईक रेट 218.42 राहिलं. तर फिलीप साॅल्टच्या 25 धावांच्या खेळीनं इंग्लंडनं या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
तत्पूर्वी इंग्लंडनं टाॅस जिंकून अमेरिका संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात अमेरिका संघ 115 धावाच करु शकला. अमेरिकेकडून नितीश कुमारनं (Nitish Kumar) 24 चेंडूत सर्वाधिक 30 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 1 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसननं 29 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 1 षटकार ठोकला. हरमीत सिंग 21, स्टीव्हन टेलर 12, कर्णधार आरोन जोन्स 10 धावा यांच्या जोरावर अमेरिकेनं सर्वबाद 115 धावा केल्या.
इंग्लंडसाठी प्रतिभावान वेगवान गोलंदाज ख्रिस जाॅर्डननं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज सॅम करन आणि फिरकीपटू आदिल रशीदनं प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि रीस टोपले यांनी 1-1 विकेट घेत अमेरिकेला 115 धावांवर रोखले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह इंग्लंडनं सेमीफायनलकडे आगेकूच केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेनं इंग्लंडसमोर ठेवलं 116 धावांचं आव्हान!
शाकिब अल हसननं रचला इतिहास! टी20 वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
ENG vs USA सामन्यात इंग्लंडनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11