यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 49 वा सामना युनायटेड स्टेट्स अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना खेळला रंगणार आहे. इंग्लंडची धुरा जोस बटलरच्या हाती आहे. तर अमेरिका संघ आरोन जोन्सच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. सुपर 8 च्या 9 व्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडत आहेत.
सुपर 8 मध्ये अमेरिका आणि इंग्लंड हे दोन्ही संघ ग्रुप-2 मध्ये समाविष्ट आहेत. सुपर 8 मध्ये इंग्लंड संघानं 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी पहिल्या सामन्यात यजमाना वेस्ट इंडिजला धूळ चारली. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा धुव्वा उडवला. त्यांमुळं त्यांना सेमीफायनलसाठी आजचा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु त्यांच्यासमोर नवखा संघ अमेरिकेचं आव्हान असणार आहे.
अमेरिकेनं यंदाच्या टी20 विश्वचषकात अविश्वसनीय कामगिरी केली. त्यांनी पाकिस्तानसारख्या चॅम्पियन संघाला धूळ चारत सुपर 8 साठी क्वालिफाय केलं होतं. अमेरिकेनं सुपर 8 मधील 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये ते एकही सामना जिंकू शकले नाहीत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं त्यांना धूळ चारली.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ कधीही आमनेसामने आले नाहीत. यंदाच्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच भिडत आहेत. बार्बाडोसच्या मैदानावर संध्याकाळी 8:00 वाजता हा सामना रंगणार आहे.
ग्रुप-2 मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि अमेरिका हे संघ समाविष्ट आहेत त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 4 गुणांसह ते अव्वल स्थानी आहेत. यजमान वेस्ट इंडिज 2 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंड 2 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेनं अद्याप एकही सामना जिंकला नाही त्यामुळं ते चौथ्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करुन ते गुणतालिकेत उलटफेर करु शकतात.
अशा असू शकतात दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली.
अमेरिका- आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, अँड्रिस गॉस, नितीश कुमार, कोरी अँडरसन, मिलिंद कुमार, हरमीत सिंग, नोस्टुश केन्झिगे, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावळकर.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर नवीन उल हकची सोशल मीडियावर विचित्र पोस्ट, कुणाकडे इशारा?
हरवलेला चेंडू शोधण्यासाठी विराट कोहलीची तारांबळ! व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लुटला आनंद
सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जोरदार स्वागत! या खेळाडूनं जिंकलं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं मेडल