---Advertisement---

ENG vs USA सामन्यात इंग्लंडनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

On: रविवार, जून 23, 2024 7:37 PM
ENG vs USA
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 49वा सामना (23 जून) अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. सुपर 8 ग्रुप-2 मधील ही लढत आहे. इग्लंड संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली तर अमेरिका आरोन जोन्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

इंग्लंड- फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले

अमेरिका- स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), नितीश कुमार, आरोन जोन्स (कर्णधार), कोरी अँडरसन, मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावळकर

इंग्लंडनं सुपर 8 सामन्यात 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 1 सामना जिंकला आहे. यजमान वेस्ट इंडिजचा पराभव करुन त्यांनी 2 गुण मिळवले परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडला सेमीफायनलच्या क्वालिफाय रेसमध्ये जिवंत राहण्यासाठी आजचा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. परंतू प्रथमच यंदाच्या टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी केलेल्या अमेरिका संघाचं त्यांना मोठं आव्हान आहे.

अमेरिकेनं यंदाच्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. साखळी सामन्यात त्यांनी कॅनडा आणि पाकिस्तानसारख्या चॅम्पियन संघाला धूळ चारली आणि सुपर 8 साठी क्वालिफाय केलं. परंतु सुपर 8 सामन्यामध्ये ते अद्याप एकही सामना जिंकू शकले नाहीत. त्यांनी 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजनं त्यांचा पराभव केला. आजच्या सामन्यात अमेरिका इंग्लंडला भिडण्यासाठी सज्ज आहे.

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघांचा कधीही आमनासामना झाला नाही. यंदाच्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच भिडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुलामुलींना समान संधी देण्यास प्राधान्य, ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आश्वासन
भारत जाणार विश्वचषकाबाहेर, फक्त ‘ही’ समीकरणं जुळून आली तर होणार अवघड
अमेरिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड? जाणून घ्या सविस्तर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---