यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 सामना आज (27) जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs England) यांच्यामध्ये खेळला गेला. प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना रंगला होता. रोहितच्या सेननं या मैदानावर इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि भारतानं 172 धावांचा बचाव करत 68 धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये धडक मारली.
भारतानं दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ सर्वबाद 103 धावाचं करु शकला. त्यामध्ये कर्णधार जोस बटलर 23, हॅरी ब्रूक, 25, जोफ्रा आर्चरच्या 21 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 10 गडी गमावून 103 धावा केल्या. भारतासाठी फिरकीपटू अक्षर पटेलनं बटलरला बाद करत विकेट्सची सुरुवात केली. भारतासाठी फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला.
तत्पूर्वी इंग्लंडनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 39 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. यादरम्यानं त्यानं 6 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) 47 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 23, रवींद्र जडेजा 17 धावांच्या जोरावर भारतानं 7 गडी गमावून 171 धवा ठोकल्या होत्या.
इंग्लंडसाठी ख्रिस जाॅर्डननं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले, सॅम करन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) देण्यात आला. इंग्लंडला पराभूत करुन भारतानं फायनलसाठी तिकीट पक्क केलं. भारत फायनलमध्ये (29 जून) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
इंग्लंड- फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा गोलंदाजी रेकाॅर्ड अक्षर पटेलनं काढला मोडीत
कर्णधार रोहित शर्माचं झंझावाती अर्धशतक! भारताचं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान
यंदाच्या टी20 विश्वचषकात कोहलीचा आयपीएल फाॅर्म ठरला झीरो!