यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यामध्ये खेळला जात आहे. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगला आहे. भारतानं या सामन्यात टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरले होते परंतू रोहित शर्मा दुसऱ्या ओव्हरमध्ये फिरकीपटू केशव महाराजच्या चेंडूवर बाद झाला. महाराजच्या चेंडूवर हेनरिक क्लासेननं रोहितचा उत्कृष्ट झेल पकडला. तर पाठोपाठ यष्टीरक्षक रिषभ पंतला देखील महाराजनं क्विंटन डी काॅकच्या हातामध्ये झेलबाद केलं आणि एकाच ओव्हरमध्ये भारताला दुसरा झटका दिला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
महत्त्वाच्या बातम्या-
भारत बनणार विश्वविजेता! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी
फायनल सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं! जाणून घ्या दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
फायनल जिंकताच रोहित शर्मा रचेल इतिहास, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला कर्णधार