यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 43वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली. दोन्ही संघ टी20 विश्वचषकातील सुपर 8च्या सामन्याला (20 जून) रोजी बार्बाडोस येथे आमनेसामने असणार आहेत. तत्पूर्वी अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत म्हणाले की, (20 जून) रोजी होणाऱ्या सामन्यात भारताचा संघ मजबूत आहे. परंतू अफगाणिस्तानला सुद्धा हलक्यात नाही घेतले पाहिजे.
लालचंद राजपूत (Lalchand Rajput) क्रिकेट कंट्रीशी बोलताना म्हणाले की, “भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना खूप रोमांचक होईल. अफगाणिस्तान संघ यावेळी खूप चमकदार कामगिरी करत आहे आणि त्यांना माहित आहे की मोठे सामने कसे जिंकायचे. भारतासाठी हा सामना एकतर्फी होणार नाही. भारताला या सामन्यात संघर्ष करावा लागेल.”
पुढे बोलताना राजपूत म्हणाले, “बार्बाडोस मध्ये जो संघ टाॅस जिंकेल तोच संघ या सामन्याचा विजेता ठरेल. कारण बार्बाडोसच्या मैदानावर वेगवान गालंदाजांना जास्त मदत मिळते. याआधी सुद्धा वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर खूप मदत मिळत होती. परंतु ही खेळपट्टी आता स्लो झाली आहे. त्यामुळे जो संघ टाॅस जिंकेल त्या संघाला या परिस्थितीचा खूप फायदा मिळेल. जर या खेळपट्टीवर चेंडू उसळत असेल तर, टाॅस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल.”
बार्बाडोसच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल का? असे राजपूतला यांना विचारले असता ते म्हणाले, “हे बघा, आता खेळपट्टी कशी आहे याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही. खेळपट्टी चांगली असेल तर अफगाणिस्तानकडे सर्वोत्तम फिरकीपटू आहेत. त्यामध्ये राशीद खान, मोहम्मद नबी आणि नूर अहमद सारखे फिरकी गोलंदाज आहेत. भारताकडे अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजासारखे फिरकीपटूही आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मृती मानधनानं आयसीसी क्रमवारीत मारली मुसंडी!
2026चा टी20 विश्वचषक खेळणार का? केन विल्यमसननं दिली प्रतिक्रिया
सुपर-8 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान स्टार खेळाडूला दुखापत