यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) न्यूझीलंडचा संघ काही खास कामगिरी करु शकला नाही. त्यांनी यंदाच्या टी20 विश्वचषकातला शेवटचा साखळी सामना पापुआ न्यू गिनी या संघासोबत खेळला आणि यंदाच्या टी20 विश्वचषकातला दुसरा विजय मिळवत या विश्वचषकाला अलविदा केलं. सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, या टी20 विश्वचषकातून बाहेर पडलोय म्हटल्यावर एकजूट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु त्यानं 2026च्या टी20 पुनरागमनाविषयी काही सांगितलं नाही.
केन विल्यमसन (Kane Williamson) हा सर्व फॉरमॅटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक मानला जाणारा खेळाडू आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीसाठी विल्यमसन हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडनं 2015 आणि 2019 मधील एकदिवसीय विश्वचषक आणि 2021 मधील टी20 विश्वचषक यासह तीन वेळा विश्वचषक अंतिम फेरी गाठली.
विल्यमसनला 2026च्या स्पर्धेत परतणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, “अरे, मला माहित नाही.” न्यूझीलंडची यंदाच्या टी20 विश्वचषकातील मोहीम पापुआ न्यू गिनीवर 7 गडी राखून विजय मिळवून संपली. 10 वर्षांत प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात न्यूझीलंड अपयशी ठरलं. वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख ट्रेंट बोल्टनं आधीच पुष्टी केली होती की, सध्या सुरू असलेला टी20 विश्वचषक हा त्याचा शेवटचा असेल. विल्यमसन म्हणाला, “आम्हाला पुढील वर्षी प्रामुख्याने लाल चेंडूचे क्रिकेट खेळायचे आहे.”
तो म्हणाला, “मी इतर फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेन आणि मग बघू कसे घडते. मला वाटतं काहीही झालं तरी तुम्हाला नेहमी अधिक करायचं असतं. परंतु हा खरोखरच मोठा अनुभव होता. प्रत्येकासाठी हा एक अनोखा अनुभव आहे. मला वाटतं की, फलंदाजांसाठी परिस्थिती आव्हानात्मक आहे, परंतु त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर-8 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान स्टार खेळाडूला दुखापत
पाकिस्तानी क्रिकेटपटूची भररस्त्यात सटकली, थेट चाहत्यावरच गेला धावून; VIDEO व्हायरल
भारतीय संघात कुलदीप यादवला संधी मिळाल्यास कोणत्या खेळाडूचा होणार पत्ता कट?