यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली. भारतानं पहिल्या 3 सामन्यात सलग विजय मिळवले. तत्पूर्वी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषकात 3 सामन्यात अजून दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. त्याच्या खराब फाॅर्मची चर्चा आता पुन्हा सुरु झाली आहे. परंतु भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू संजय बांगर विराटच्या फाॅर्मविषयी बोलताना म्हणाले की, ही वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे.
विराट कोहलीनं (Virat Kohli) आयपीएल 2024च्या हंगामात आरसीबीकडून खेळताना सलामीला येऊन 15 सामन्यांमध्ये सर्वाधिक 741 धावा ठोकल्या होेत्या. आयपीएल 2024चा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या विराट कोहलीला यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघानं सलामीला खेळण्याची संधी दिली, परंतु कोहलीनं सर्वाना निराश केलं. तो त्याचा आयपीएलमधील फाॅर्म कायम ठेवू शकला नाही. त्यानं 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत.
संजय बांगर (Sanjay Bangar) विराट कोहलीच्या फाॅर्मविषयी स्टार स्पोर्टशी बोलताना म्हणाले की, “टी-20 विश्वचषकात त्यानं कधीही भारतासाठी सलामी दिली नाही. हे स्पष्ट आहे की ही थोडी नवीन परिस्थिती आहे आणि न्यूयॉर्कमधील परिस्थिती पाहता, तुमची पहिली चूक ही तुमची शेवटची चूक होती. जेव्हा दोन समान संघांमधील सामना असतो तेव्हा सलामीच्या फलंदाजांना नक्कीच थोडा संघर्ष करावा लागतो. काळजी करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते.”
भारतानं यंदाच्या टी20 विश्वचषकात विराट कोहलीला सलामीला खेळण्याची संधी दिली. परंतु अद्याप या बदलाचा काही उपयोग झाला नाही. विराटचा हा फाॅर्म बघून भारतीय फॅन्स त्याला पुन्हा तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी सल्ला देऊ लागले आहेत. परंतु भारतीय मॅनेजमेंटनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता सुपर 8 सामन्यांमध्ये कोहली कितव्या नंबरला फलंदाजी करतो हे पाहणंदेखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे सौरभ नेत्रावलकरची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला?
स्मृती मानधनाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण!
सुपर 8 मध्ये भारताला ‘या’ दोन संघांपासून सावध राहावं लागेल, माजी खेळाडूचा इशारा