यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातला (ICC T20 World Cup) सुपर 8चा तिसरा सामना गुरुवारी (20 जून) रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे आणि राशीद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखाली अफगाणिस्तान, बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर भिडणार आहेत. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेननं (Dale Steyn) रोहित शर्मा आणि विराट कोहलीला (Virat Kohli) इशारा दिला आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत फजलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) आतापर्यंत फलंदाजांसाठी घातक ठरला आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात त्यानं आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. फारुकीनं आतापर्यंत 4 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 6.66 आहे. तर, फारुकीनं यादरम्यानं एका सामन्यात 5 विकेट्स सुद्धा घेतले आहेत. यासोबतच यंदाच्या टी20 विश्वचषकात त्यानं एकाच सामन्यात 4 विकेट्सही त्याच्या नावावर केल्या आहेत.
डेल स्टेन (Dale Steyn) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. अफगाणिस्तानचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी तुमच्यासाठी धोका बनू शकतो. टीम इंडियाकडून सुरुवात करणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून अप्रतिम आहे. एकदिवसीय, टी20 आणि कसोटी क्रिकेट या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यानं वर्चस्व गाजवलं आहे.”
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) अद्याप या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केलेली नाही. विराट कोहलीला आतापर्यंत 3 सामन्यात केवळ 5 धावा करता आल्या आहेत. सुपर 8 मध्ये विराट कोहली नक्कीच चांगली कामगिरी करेल असे अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी म्हटलं आहे. तर रोहित शर्मानं 3 सामन्यात 68 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यानं अर्धशतकही झळकावलं आहे. रोहितची या टी20 विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्या नाबाद 52 राहिली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान संघ भारतापुढे विजय मिळवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट जगतासाठी धक्कादायक बातमी; टीम इंडियाच्या या खेळाडूने केली आत्महत्या
‘या’ खेळाडूला मिळणार संधी; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितला गेम प्लॅन
हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर