---Advertisement---

हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर

On: गुरूवार, जून 20, 2024 2:26 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने यंदाच्या टी20 विश्वचषक बद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. स्टेनने यावेळी टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे दिली आहेत. वास्तविक, सुपर 8 सुरु झाला आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मधील पहिला सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा पराभव केला, तर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला, अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाने उपांत्य फेरी गाठू शकणारे चार संघ निवडले आहेत.

डेल स्टेनच्या मते, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. त्याचबरोबर स्टेनने इंग्लंडला टॉप 4 संघातही ठेवले नाही. वास्तविक, सुपर 8 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. इंग्लंड संघाने ज्या तुफानी शैलीने कामगिरी केली त्यामुळे जागतिक क्रिकेटला धक्का बसला आहे. पण स्टेनने विश्वविजेत्या इंग्लंडला त्याच्या टाॅप-4 मध्ये निवडले नाही. हे निश्चितच आश्चर्यकारक आहे.

टी20 विश्वचषकाच्या शेवटच्या आवृत्तीत 2002 मध्ये इंग्लंड संघ विजेता ठरला होता. इंग्लंड संघाने 2010 आणि 2022 मध्ये टी20 विश्वचषक आपल्या नावे केला आहे.  तर भारतीय संघाने एकदा खिताब आपल्या नावे केला आहे. याशिवाय वेस्ट इंडिजने देखील दोन वेळा ट्राॅफी जिंकले आहे. आता डेल स्टेनने इंग्लंडला टाॅप-4 मध्ये न ठेवल्याबाबत केलेले भाकित खरे ठरते की नाही हे पाहणे बाकी आहे. इंग्लंडचा संघ ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहता हा संघ आता खूपच धोकादायक दिसत आहे.

महत्तवाच्या बातम्या-

सुपर-8 फेरीपूर्वी दोन्ही संघांना धोक्याची घंटा! भारत-अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?
कसोटी क्रिकेटमध्ये आधिराज्य गाजवणाऱ्या किंग कोहलीनं आजच्या दिवशी केलं होतं पदार्पण!
गतविजेत्या इंग्लंडनं यजमान वेस्ट इंडिजला चारली धूळ; 8 विकेट्सनी मिळवला एकतर्फी विजय

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---