यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातला (ICC T20 World Cup) 47वा आज (22 जून) भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. सुपर 8 मधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा येथे हा सामना रंगणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती आहे. तर बांग्लादेश नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. बांग्लादेशनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
बांग्लादेश- तन्झीद हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), तौहिद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
भारतानं सुपर 8 मधील पहिला सामना (20 जून) रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी धुव्वा उडवला. भारतानं यंदाच्या टी20 विश्वचषकात धमाकेदार कामगिरी केली आहे. भारतानं या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावला नाही. साखळी सामन्यात विजयाची हॅट्रिक लगावली तर सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात बाजी मारली. त्यामुळे बांग्लादेश संघासमोर भारतीय संघाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषकात नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशनं सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आणि बांग्लादेशनं या टी20 विश्वचषकातला सुपर 8 मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला या सामन्यात ऑस्ट्रेलियानं त्यांचा 28 धावांनी पराभव केला. बांग्लादेश संघाला या सामन्यात भारतीय संघाचं मोठं आव्हान आहे.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांग्लादेश 13 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 12 सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवलं आहे. त्यातीलच 4 सामन्यांमध्ये दोन्ही संघ टी20 विश्वचषकात भिडले आहेत. त्यामध्ये भारतानं बांग्लादेशला एकही सामना जिंकून दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक सुपर-8 च्या अंतिम टप्यात! जाणून घ्या संपूर्ण संघांची स्थिती, उपांत्य फेरीचे समीकरण
भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी PM मोदींनी दोन्ही संघांना दिल्या शुभेच्छा
आश्चर्यकारक! 15 ओव्हरमध्ये दिला केवळ 1 षटकार, फलंदाजांसाठी बुमराह घातक