---Advertisement---

VIDEO: बॅटींगनंतर फिल्डींगमध्ये हेटमायर ठरला फायर! भन्नाट कॅच पाहून फलंदाजही झाला चकित

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 6:31 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये दुसरा सामना शनिवारी (७ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टनने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात हेटमायर त्यांच्यासाठी एकटाच भारी पडला. त्याने फलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणातही कमाल केली. त्याने घेतलेल्या एका झेलला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायरने पहिले तर वेस्ट इंडिजकडून विश्वचषकातील जलद अर्धशतक केले, नंतर त्याने क्षेत्ररक्षण करताना उत्तम झेलही घेतला. त्याने स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ज मुन्सेचा सीमारेषेवर ज्याप्रकारे हवेत सूर मारत झेल घेतला, ते पाहून फलंदाज आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनाही विश्वास बसला नाही.

ही घटना स्कॉटलंडच्या डावाच्या ६व्या षटकात घडली. शामर जोसेफच्या त्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॉर्जने चांगला पूल शॉट खेळला, मात्र हेटमायरने धावत आणि हवेत सूर मारत तो कॅच पकडला. जॉर्ज १५ चेंडूत १९ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने ३ चौकार मारले. या विकेटनंतर स्कॉटलंडची स्थिती ६ षटकातच ३ बाद ३८ धावा अशी झाली होती.

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १८२ धावसंख्या उभारली. यामध्ये हेटमायरने ३६ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन चौकार आणि ६ षटकार मारले. त्याने २२ चेंंडूतच अर्धशतक केले होते. तसेच त्याने तिसऱ्या विकेटसाठी रोवमन पॉवेलसोबत ३७ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली.

वेस्ट इंडिजने हा सामना ३५ धावांनी जिंकला. रोमारियो शेफर्डने ३ षटकात २० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच सामनावीर हेटमायर ठरला.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात नेदरलॅंड्सचा ३ विकेट्से पराभव केला. दिवसाचा तिसरा सामना यजमान भारत विरुद्ध युएसए यांच्यात वानखेडे स्टेडियम, मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---