---Advertisement---

T20 WC26: पाकिस्तानच्या सुपर-8च्या दुसरा सामन्यावरही पावसाचे सावट? पल्लेकेलेमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना

On: मंगळवार, फेब्रुवारी 24, 2026 12:43 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८चा आजचा (२४ फेब्रुवारी) सामना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा खेळला जाणार आहे. हा सामना कॅंडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार असून त्याची सुरूवात संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. पाकिस्तानचा सुपर-८चा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे त्यांच्यासाठी इंग्लंडविरुद्धचा सामना महत्वाचा आहे. अशातच हा पण सामना पावसामुळे रद्द झाला तर त्यांच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्यात अडचणी येतील. दुसरीकडे इंग्लंडने त्यांचा सुपर-८चा पहिला सामना जिंकला आहे. यासाठी कॅंडीचे वातावरण सामन्यादरम्यान कसे असेल हे जाणून घेऊ.

काही सूत्रानुसार, सामन्यादरम्यान कॅंडीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. तसेच तापमान १९ डिग्री सेल्सियसच्या आसपास असणार आहे. हवामान स्वच्छ असणार आहे. यावरून सामन्यावर पावसाचे सावट नसणार, असे निश्चित होते.

पाऊस पडण्याची शक्यता केवळ १३ टक्के असून वादळाची शक्यता ३ टक्के आहे. हवामानाच्या रिपोर्ट्समध्ये कुठेही पावसाची शक्यता सांगितलेली नाही. यामुळे सामन्याची सुरूवात ठरल्याप्रमाणे होणार आहे. तसेच हा सामना संपूर्ण षटकांचा होणार असल्याने चाहत्यांना काळजी करण्याचे काही कारण नाही.

सुपर-८च्या ग्रुप -२ मध्ये असलेले हे संघ, याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर इंग्लंड आहे. त्यांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते. यामुळे ते २ अंकांसह पहिल्या स्थानावर आहेत. पाकिस्तानला एक अंक मिळाला असून ते या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात अंतिम अकरामध्ये बदलाची शक्यता नाही, तर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध काही बदल केले होते, मात्र तो सामना झालाच नाही. यामुळे त्यांनी केलेले बदल जसे की त्यांनी शाहीन आफ्रिदीच्या जागी सलमान मिर्झाला संघात घेतले होते. तसेच फखर जमान हा पण एक बदल केला होता. आता ते पुन्हा यांना संधी देणार की नाही हे कळेलच.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---