---Advertisement---

शेवटच्या क्षणी आयसीसीने केला टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या ठिकाणात बदल, आता सर्व पाकिस्तान-श्रीलंकेवर अवलंबून

On: मंगळवार, फेब्रुवारी 24, 2026 11:07 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८चे सामने सुरू आहेत. या स्पर्धेचे काही सामने श्रीलंकेत खेळले जात असून श्रीलंकेला त्यांचा उपांत्य फेरीचा सामना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी आहे, मात्र हे सगळे त्यांच्या पात्रतेवर आणि कोणाविरुद्ध खेळणार यावर अवलंबून असणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका शेवटच्या चारमध्ये पोहोचली त्यामध्ये भारत किंवा पाकिस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाशी सामना करावा लागला जो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर श्रीलंका त्यांचा बाद फेरीचा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोमध्ये खेळेल. आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) त्यांच्या ठरलेल्या नियोजनात श्रीलंकेसाठी बदल केला आहे.

आयसीसीने असे अधिकृतपणे सर्व स्टेकहोल्डर्सला सांगितले आहे. त्यामध्ये असे म्हटले गेले, ‘पहिला उपांत्य फेरीचा सामना कोलंबो किंवा कोलकातामध्ये खेळला जाईल. पाकिस्तान यासाठी पात्र ठरला तर ते तो सामना ४ मार्चला कोलंबोमध्ये खेळला जाईल.’

पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र नाही ठरला आणि श्रीलंका पात्र ठरत त्यांचा हा सामना भारताव्यतिरिक्त इतर कोणाशीही असला तर ते तो सामना कोलंबोमध्ये खेळतील, असेही आयसीसीने त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

तसेच पाकिस्तान किंवा श्रीलंका दोघेही उपांत्य फेरीसाठी पात्र नाही ठरले तर तो सामना कोलकातामध्ये खेळला जाईल आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियम, मुंबईमध्ये खेळला जाणार हे निश्चित आहे. यावरून जर भारताचा सामना पाकिस्तानशी नसेल तर सूर्यकुमार यादव आणि संघ वानखेडेवर त्यांचा उपांत्य फेरीचा सामना खेळेल.

त्याचबरोबर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नाही तर हे दोन्ही सामने कोलकाता (४ मार्च) आणि मुंबईमध्ये (५ मार्च) खेळले जाणार. आयसीसीने आधी केवळ पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला तर तो सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार, असे नियोजित केले होते. तेव्हा त्यांनी श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचला तर त्यांचा तो सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार की नाही हे सांगितले नव्हते.

श्रीलंका आणि पाकिस्तान एकाच संघात असल्याने हे दोघे उपांत्य फेरीत समोरा-समोर येणार नाहीत. तसेच भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडले, तर तो सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार. पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर त्यासाठीही ठिकाण बदलले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळण्याचे नियोजन आहे, मात्र पाकिस्तान यासाठी पात्र ठरला तर तो सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार असाही बदल आयसीसीने केला आहे. यावरून आयसीसीच्या बदलांमध्ये पाकिस्तानची भुमिका मोठी आहे.

या स्पर्धेत भारत, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांनी त्यांचे पहिले सुपर-८चे सामने गमावले आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघाला एक-एक अंक वाटून दिला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने त्यांचे पहिले सुपर-८चे सामने जिंकले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---