आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून बुधवारी (23 डिसेंबर) टी-20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली. या यादीत फलंदाजी क्रमवारीमध्ये भारताचा केएल राहुल हा तिसर्या क्रमांकावर कायम आहे. सोबतच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक अंकाचा फायदा झाला असून तो या यादीत सातव्या क्रमांकावर पोहचला आहे.
जर क्रमवारीमधील फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू या तिन्ही कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुल हे दोघेच फक्त टॉप टेनमध्ये आहेत. जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीमध्ये 19 व्या क्रमांकावर आहे.
डेविड मलान आहे पहिल्या क्रमांकावर
केएल राहुल 816 गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज डेविड मलान 915 गुणांनी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर बाबर आझम हा 820 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. मात्र, विराट कोहली 697 गुणांसह सातव्या स्थानी आहे आणि त्याचबरोबर त्याचा तिन्ही प्रकारात टॉप टेन मध्ये समावेश आहे.
कोहली वनडेमध्ये पहिल्या, तर कसोटीत दुसर्या क्रमांकावर आहे. इतर खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा सलामी फलंदाज टीम सेफर्ट आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदी यांनी पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 या फरकाने विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली यामुळे त्यांना फायदा झाला असून त्यांनी कारकिर्दीत सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त केले.
सेफर्टने मालिकेत 176 धावा केल्याने, त्याने 24 क्रमांकावरून 9 व्या स्थानी झेप घेतली. त्याचबरोबर साऊदीने या मालिकेत 6 विकेट्स घेतल्यामुळे त्याने 13 व्या क्रमांकावरून सातव्या स्थानी झेप घेतली. साऊदी आपल्या कारकिर्दीत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये टॉप टेनमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरला. तो आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वश्रेष्ठ चौथ्या आणि वनडेत नवव्या स्थानी पोहचला आहे. डेवन काॅन्वे 62 व्या आणि ग्लेन फिलिप्स 72 व्या स्थानी पोहोचले आहेत. न्यूझीलंडचे इतर खेळाडू फलंदाज ही पुढे सरकले आहेत.
इंग्लंड पहिल्या तर भारत तिसर्या स्थानी विराजमान
पाकिस्तान संघाकडून मोहम्मद हाफिज 140 धावा करून 14 स्थानाच्या फायद्याने 33 व्या क्रमांकावर पोहचला. गोलंदाजाच्या यादीत फहीम अश्रफ 13 व्या आणि शाहीन आफ्रिदी 16 व्या स्थानी आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि अष्टपैलू कामगिरीत राशिद खान आणि मोहम्मद नबी पहिल्या स्थानावर आहेत.
आयसीसीच्या टी-20 क्रमवारीमध्ये पाकिस्तान संघाची तीन क्रमांकाने घसरण झाली आहे, तर न्यूझीलंड संघाला तीन क्रमांकाचा फायदा झाला आहे. त्यामुळे ते सहाव्या स्थानावर कायम आहेत. पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. इंग्लंड 275 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 272 गुणांसह दुसर्या आणि भारत 268 गुणांसह तिसर्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना