भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. तसेच वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशविरुद्ध २-० अशी कसोटी मालिका जिंकली. यानंतर बुधवारी(१७ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
या ताज्या क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत आर अश्विन, रोहित शर्मा आणि रिषभ पंतने गरुड भरारी घेतली आहे. याबरोबरच गोलंदाजीत इंग्लंडचा जॅक लीच, वेस्ट इंडिजचा राहकिम कॉर्नवॉल यांनी मोठी प्रगती केली आहे.
रोहितने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत १६१ धावांची दीडशतकी खेळी केली. याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला असून त्याने पहिल्या १५ जणांच्या फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता १४ व्या क्रमांकावर आला आहे. तसेच आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात केेलेल्या १०६ धावांच्या शतकी खेळीमुळे १४ स्थानांची प्रगती करत ८१ वे स्थान मिळवले आहेत. तर रिषभ पंतने फलंदाजांच्या यादीत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ११ वे स्थान मिळवले आहे.
याशिवाय वेस्ट इंडिजच्या क्रुमाह बॉनरने फलंदाजांच्या यादीत ६३ वे स्थान मिळवले आहे. तो बांगलेदविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरला होता.
फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा केन विलियम्सन अव्वल स्थानी तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानी कायम आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुटची मात्र, एका स्थानाने घसरण झाली आहे. तो चौथ्या क्रमांकावर घसरला असून मार्नस लॅब्यूशेन तिसऱ्या स्थानी आला आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली ५ व्या क्रमांकावर कायम आहे. याशिवाय चेतेश्वर पुजारा ८ व्या क्रमांकावर कायम आहे.
गोलंदाजांच्या यादीत ब्रॉडची घसरण
गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन ७ व्या क्रमांकावर कायम आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला मोठे नुकसान झाले आहे. तो ४ स्थानांनी खाली आला आहे. तो आता ६ व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांच्या यादीत पहिल्या १० जणांमध्ये अश्विनशिवाय केवळ जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाज आहे. बुमराह ८ व्या क्रमांकावर कायम आहे.
तसेच या यादीत फिरकीपटू कुलदीप यादव ५० व्या क्रमांकावर आला आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने ६८ वे स्थान मिळवले आहे. त्याने या सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. तर इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने ६ स्थानांची प्रगती करत ३१ वे स्थान मिळवले आहे. याशिवाय कॉर्नवॉलने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याने १६ स्थानांची प्रगती करत ४९ वे स्थान मिळवले आहे.
🔸 Rohit Sharma breaks into top 15 batsmen
🔸 Rishabh Pant achieves career-best position
🔸 Gains for Bangladesh, West Indies and England playersAll this and much more in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings 👇https://t.co/oTSOyRyVJt
— ICC (@ICC) February 17, 2021
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत बेन स्टोक्सची मोठी घसरण झाली आहे. तो पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळे आता अव्वल क्रमांकावर जेसन होल्डर विराजमान झाला असून रविंद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर आर अश्विनने एका स्थानाची प्रगती करत या यादीत ५ व्या क्रमांकावर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
किंग्ज इलेव्हन पंजाबने का केला नावात बदल? खुद्द संघमालकांनीच सांगितले कारण
मित्रप्रेम की योगायोग? १७ फेब्रुवारी डिविलियर्स आणि डू प्लेसिससाठी ठरतोय खास दिवस
रग्बी खेळाडू ते देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार : जाणून घ्या फाफ डू प्लेसिसबद्दल रंजक गोष्टी