सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या ट्रॉफीला खुद्द आयसीसीनेच ट्रोल केले आहे. या मालिकेच्या ट्रॉफीचे नाव टीयुसी कप असे आहे. टीयुसी हे पाकिस्तानमधील बिस्कीटचे ब्रॅंड आहे.
टीयुसीचे मुळ लक्षात घेऊन पीसीबीने (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) कंपनीला बिस्कीटच्या डिझाइनची ट्रॉफी बनविण्यास सांगितले. यामुळे ही ट्रॉफी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
यावेळी आयसीसी या ट्रॉफीचे अनावरण झाल्यावर ‘तुमच्यामुळे बिस्कीटला एक नवे अर्थ प्राप्त झाले’, असे ट्विट करत पीसीबीला ट्रोल केले.
Giving taking the biscuit a whole new meaning! https://t.co/YA1B7O3lUk
— ICC (@ICC) October 23, 2018
तसेच आयसीसीने या ट्रॉफीची आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची तुलना केल्याने नेटीझन्संना ट्रोल करण्याची संधी मिळाली.
Who approved this Biscuit Trophy!? https://t.co/ACwEkfOlzO
— One day at a time (@Daniyal_Himself) October 23, 2018
After seeing the economic condition of Pakistan I am confident that they will put all their efforts in winning the Roti Cup
— p (@LifeRockdMe) October 23, 2018
https://twitter.com/TanvirBhattiPK/status/1054739436976726016
https://twitter.com/DennisCricket_/status/1054833849790738432
काल (24 ऑक्टोबर) झालेल्या या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 66 धावांनी पराभूत करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. पण दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला सर्वबाद फक्त 89 धावाच करता आल्या. तसेच पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियावरील सर्वात मोठा विजय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–उर्वरित वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन मोठे बदल
–क्रिकेट इतिहासातील सर्वात दिग्गज कर्णधाराचे विक्रम विराटने किरकोळीत मोडले