काल (9 फेब्रुवारी) सेनवेस पार्क (Senwes Park), पोटचेफस्ट्रूम (Potchefstroom ) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील अंतिम सामना 19 वर्षाखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षाखालील बांगलादेश संघात (U19 India vs U19 Bangladesh) पार पडला. बांगलादेशने भारताला पाचव्यांदा विश्वविजेता बनण्यापासून रोखत या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर पहिल्यांदाच 19 वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारताविरुद्ध विश्वचषक जिंकल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू हा विजय उत्साहात साजरा करताना दिसले. परंतु हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून गैरवर्तन झाल्याचे दिसून आले.
या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्येे मैदानावर विजय साजरा करण्यासाठी आलेले बांगलादेशचे खेळाडू आणि भारतीय संघाचे खेळाडू यांच्यामध्ये भांडण झाल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी हे खेळाडू एकमेकांना धक्काबुक्कीही करताना दिसत आहेत. अखेर पंचांना मध्यस्थी करावी लागली आहे.
https://twitter.com/HitmanCricket/status/1226574081077600256?s=08
यावेळी बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने (Akbar Ali) सामन्यानंतर या घटनेबद्दल माफी मागितली. तसेच तो म्हणाला की, जे काही झाले ते दुर्दैवी होते. खेळाडूंनी आनंदाच्या भरात येऊन गैरवर्तन केले.
“आमचे काही खेळाडू जास्तच उत्साहाच्या भरात होते. सामन्यानंतर जे काही झाले ते दुर्दैवी होते. मी भारतीय संघाचे अभिनंदन करू इच्छितो. हे स्वप्न पूर्ण करण्यासारखे होते. आम्ही पहिल्या दोन वर्षात केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे,” असे अली यावेळी म्हणाला.
तसेच या घटनेबद्दल भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला, ‘खेळात चढ-उतार येत असतात. हार-जीत हे खेळाचे भाग आहेत. परंतु, विरोधी संघाच्या प्रतिक्रिया वाईट (डर्टी) होत्या. मला असे वाटते की, असे व्हायला नको होते. पण ठीक आहे.’
आता या घटनेनंतर आयसीसी या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
बांगलादेशच्या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिला विश्वचषक जिंकला आहे. तसेच बांगलादेशचा संघ या संपूर्ण स्पर्धेत एकही सामन्यात पराभूत न होता अजिंक्य राहिला.
पवारांच्या बारामतीत रणजी सामना खेळणार विश्वविजेता कर्णधार
वाचा????https://t.co/THwdrv7Uav????#म #मराठी #Cricket— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020
जेव्हा राहुल द्रविड थेट मुख्यमंत्र्यांनाच करतो गोलंदाजी
वाचा????https://t.co/ddHf6jirtk????#म #मराठी #Cricket #TeamIndia #RahulDravid— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020




