---Advertisement---

भारतात परतताना तुटली यशस्वी जयस्वालची ट्रॉफी…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2020 6:48 PM
---Advertisement---

रविवारी (9 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या (U-19 World cup) अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने 3 विकेट्सने भारतीय संघाचा पराभव केला. असे असतानाही, या संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच त्याला या स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कारदेखील देण्यात आला.

या सामन्यानंतर भारतात परत येत असताना प्रवासादरम्यान त्याच्या मालिकावीर पुरस्काराच्या ट्रॉफीचे नुकसान झाले. परंतु, आता त्या नुकसानाची भरपाई करत त्याची ट्रॉफी नीट करण्यात आली आहे.

जयस्वालच्या जवळच्या सूत्रांनी गुरुवारी रात्री पीटीआयला माहिती दिली की, प्रवासादरम्यान ट्रॉफीचे काही नुकसान झाले. परंतु, आता आम्ही ते दुरूस्त केले आहेत. प्रवासात अशा गोष्टी होत असतात, असे देखील त्यांनी सांगितले.

जयस्वालचे प्रशीक्षक ज्वाला सिंह याबाबत बोलताना म्हणाले की, जयस्वालला त्याच्या धावांची नेहमी चिंता असते. परंतु, जिंकलेल्या ट्रॉफी सांभाळून ठेवण्यात त्याला अजिबात रस नाही.

19 वर्षाखालील विश्वचषकाच्या 6 सामन्यात जयस्वालने (59, 29*, 57*, 62, 105* आणि 88) 400 धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने 5 वेळा 50हून अधिक धावा केल्या. तसेच त्याने गोलंदाजी करताना 3 विकेट्सही घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---