भारतीय महिला संघाची दिग्गज फलंदाज स्मृती मंधानाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत स्वतःची जागा कायम राखली आहे. पण भारतीय संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र गोलंदाजांच्या यादीत नुकसान सोसावे लागले आहे. आयसीसीने मंगळवारी (२२ जून) ताजी एकदिवसीय क्रमवारी घोषित केली, ज्यामध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये जास्त काही हालचाल झाल्याचे दिसले नाही.
भारतीय संघासाठी २५ वर्षीय मंधाना (Smriti Mandhana) यावर्षी एकूण ९ एकदिवसीय सामने खेळली आहे आणि यामध्ये तिने ४११ धावा केल्या आहेत. आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीत (ICC Women’s ODI Ranking) मंधाना एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे, जी पहिल्या १० मध्ये सहभागी आहे. काही महिन्यांपूर्वी मंधानाने विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीज संघाविरुद्ध शतक देखील ठोकले होते. एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत एलिसा हिली ७८५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची नताली स्कीवर आहे, जिच्याकडे ७५० गुण आहेत.
झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत यापूर्वी पाचव्या क्रमांकावर होती. ताज्या क्रमावरीत झुलन सहाव्या क्रमांकावर घसरली आहे. तिने चालू वर्षात खेळलेल्या ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. झुलनला दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज अयाबोंगा खाकाने पछाडले आहे. खाकानेने आयर्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकी संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि मालिका क्लीन स्वीप केली होती.
गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ७७१ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेची जेन जॉनासेन गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जॉनासेनकडे ७५५ गुण आहेत. अष्टपैलूंच्या यादीत भारतीय संघाचा दीप्ती शर्मा सातव्या क्रमांकावर कायम आहे. अष्टपैलूंच्या यादीत इंग्लंडच्याच नताली स्कीवरचे नाव पुन्हा एकदा येते, जिच्याकडे या यादीत सर्वाधिक ३९३ धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन दिग्गज ऍलिस पेरी आहे, जिच्याकडे ३७४ गुण आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ट्वीटरपेक्षा स्वतःच्या प्रदर्शनावर जास्त लक्ष दे’, दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचा तेवतियाला खोचक टोला
नया है यह! लाईव्ह सामन्यात अंपायरिंग सोडून पंच करू लागले क्षेत्ररक्षण, झेल घेतानाचा फोटो व्हायरल