---Advertisement---

भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, पण मिताली-मंधानाच्या क्रमवारीत ‘इतक्या’ स्थानांची घसरण

Mithali-Raj
---Advertisement---

सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक (ICC Womens World Cup 2022) सुरु आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान (IND vs PAK) संघासोबत पार पडला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आयसीसीच्या एकदिवसीय महिला खेळाडूंच्या क्रमवारीत दोन क्रमांकांनी घसरल्या आहेत.

मिताली राजने पाकिस्तानविरुद्ध ९ धावा केल्या, तर मंधानाने अर्धशतक लगावले. स्म्रीती मंधानाने या सामन्यात ७५ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत. यानंतर आयसीसी क्रमवारीत भारतीय कर्णधार मिताली चौथ्या, तर मंधाना दहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे.

भारताच्या स्नेह राणाने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५३ धावांची खेळी केली, तर पूजा वस्त्राकरने ६७ धावा करत अर्धशतकीय खेळी खेळली. भारतीय संघाने पाकिस्तान संघावर १०७ धावांनी विजय मिळवला. आयसीसी क्रमवारीत राणा पहिल्या १०० खेळाडूंमध्ये नाहीये, तर वस्त्राकर ६४ व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत झूलन गोस्वामी चौथ्या क्रमांकावर आहे तसेच अष्टपैलू क्रमवारीत दीप्ति शर्मा क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे.

विश्वचषकाच्या पहिल्या पाच सामन्यानंतर आयसीसी क्रमवारीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाची फलंदाज मेग लॅनिंग या क्रमवारीत दूसऱ्या क्रमांकावर आहे. ती प्रथम क्रमांकावर असलेल्या हिली हिच्यापेक्षा १५ रेटिंग पाँइंट्सनी मागे आहे. वेस्ट इंडीज संघाची हेली मॅथ्यूज ही आयसीसीच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू या तिन्ही क्रमवारीत पुढे आहे. ती अष्टपैलू क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. ती फलंदाजीमध्ये १२ व्या क्रमांकावरुन २० व्या क्रमांकावर पोहचली आहे, तर गोलंदाजीत तिसऱ्या क्रमांकावरुन १० व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

रविवारी पाकिस्तान आणि भारत यांच्या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघाने ५० षटकात ७ विकेट गमावत २४४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ४३ षटकांत १३७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने ४ विकेट घेतल्या तर स्नेह राणाने २ आणि झुलन गोस्वामीने २ विकेट घेतल्या. भारताने हा सामना १०७ धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या

पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा: ऑल स्टार्स संघाची वॉरियर्स संघावर दोन धावांनी मात

छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?

पीटी शिक्षक ते जगातील एक नंबरचा गोलंदाज असा प्रवास करणारा सॅम्युअल बद्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---