आयसीसीने बुधवारी (१६ मार्च) ताजी महिला एकदिवसीय क्रमवारी (ICC Women’s ODI rankings) जाहीर केली. भारतीय संघाच्या दिग्गज स्मृती मंधाना आणि मिताली राज यांना या आठवड्याच्या क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनुभवी वेगवान झूलन गोस्वामीलाही नुकसान सहन करावे लागले आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषक खेळला जात आहे, ज्यामुळे क्रमावारीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले. सोफी इक्लेस्टान, एमी सॅटरवेट, मारिजाने कप्पा आणि लॉरी वोलवर्ड्ट या खेळाडूंना क्रमारीत मोठा फायदा झाला आहे.
महिला विश्वचषक (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत इंग्लंड संघाचे प्रदर्शन अतापर्यंत निराशाजनक राहिले असले तरीही, त्यांची वेगवान गोलंदाज सोफी इक्लेस्टनने अप्रतिम प्रदर्शन केले आणि क्रमावारीत त्याचा तिला फायदा झाल्याचे दिसते. सोफी गोलंदाजांच्या क्रमावारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची जेस जॉनसन आता दुसऱ्या स्थानावर आली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात सोफीने २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २३ धावा देऊन एक विकेट घेतली होती.
दक्षिण अफ्रिकेच्या मारिजाने कप्पाला फायदा
दक्षिण अफ्रिकेची मारिजाने कप्पाने इंग्लंडविरुद्ध ४५ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. तसेच पाकिस्तानविरुद्ध तिने ४३ धावा देऊन २ विकेट्स मिळवल्या होत्या. गोलंदाजांच्या यादीत मारिजाने कप्पाला ४ स्थानांचा फायदा झाला आहे आणि ती सध्या चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतीय दिग्गज झूलन गोस्वानीला क्रमावारीत नुकसान झाल्याचे दिसत आहे. झूलन यापूर्वी चौथ्या क्रमांकावर होती, पण आता ६ व्या क्रमांकावर घसरली आहे.
हेही वाचा- आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत अव्वलस्थानी, पण स्थान टिकण्यासाठी पाकिस्तानच्या विजयाची गरज; वाचा
फलंदाजांमध्ये सॅटरवेट आणि वॉलवार्ड्ट का जलवा
फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडची एमी सॅटरवेट आणि दक्षिण अफ्रिकेच्या लॉरी बोलवार्ड्टने मोठी झेप घेतली आहे. सॅटरवेटने भारताविरुद्ध ७५ धावांची खेळी केली होती. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४४ धावा केल्या होत्या. याच प्रदर्शनाच्या जोरावर क्रमवारीत तिने पाच स्थानांनी आघाडी घेत तिसरा क्रमांका गाठला आहे. वेलवार्ड्ट देखील चांगले प्रदर्शन करत आहे. पाकिस्तानविरुद्ध ७५ आणि इंग्लंडविरुद्ध ७७ धावा केल्यामुळे क्रमवारीत सात स्थानांच्या फायद्यासह ती पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतीय कर्णधार मिताली राज चौथ्या क्रमांकावरून घसरून ८व्या क्रमांकावर आली आहे. तसेच भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने पहिल्या १० खेळाडूंमधून स्वतःचे स्थान गमावले आहे.
मॅथ्यूजला कारकिर्दीतील पहिल्या शतकाचा फायदा
अष्टपैलूंच्या क्रमावारीत वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज फायद्यात आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान मॅथ्यूजने तिच्या कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले आणि इंग्लंडविरुद्ध ४५, तर भारताविरुद्ध ४३ धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये मॅथ्यूजने इंग्लंडविरुद्ध ४० धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या आणि भारताविरुद्ध ६५ धावा देऊन एक विकेट घेतली. मॅथ्यूजला दोन स्थानांचा फायदा झाला आहे आणि ती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बापरे! बायो बबल तोडल्यास खेळाडूवर एका सामन्याची बंदी, आयपीएल २०२२साठी बनली कडक नियमावली
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत मस्किटर्स संघाला विजेतेपद