---Advertisement---

सांगलीकर स्म्रीती मंधना टी२० क्रमवारीत टॉप ५ मध्ये, जाणून घ्या अन्य खेळाडूंची क्रमवारी

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2020 7:13 PM
---Advertisement---

बुधवारी (12 फेब्रुवारी) महिला तिरंगी टी20 मालिकेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात 11 धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर 155 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताला सर्वबाद 144 धावाच करता आल्या. असे असले तरी या सामन्यात भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधनाने सर्वाधिक 66 धावा केरत चांगली कामगिरी केली.

तसेच तिने या संपूर्ण मालिकेतही सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला. तिने 5 सामन्यात 43.20 च्या सरीसरीने 216 धावा केल्या. या कामगिरीचा तिला आयसीसी टी20 क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी फायदा झाला आहे.

या महिला तिरंगी टी20 मालिकेनंतर काल (14 फेब्रुवारी) आयसीसीने महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मंधनाला फलंदाजांच्या यादीत 3 स्थानांचा फायदा झाला आहे. ती 732 गुणांसोबत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

महिला फलंंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडची अष्टपैलू क्रिकेटपटू सूजी बेट्स (Suzie Bates) 765 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर, सोफी डेविन (Sophie Devine) 741 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज बेथ मूनी (Beth Mooney) तिसऱ्या स्थानावर आहे.

या व्यतिरिक्त भारताची फलंदाज जेमिमा रोड्रिक्स् (Jemimah Rodriques) 663 गुणांसह 7व्या क्रमांकावर आहे. तर, भारतीय महिला टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (643) हिने आपले 9व्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे.

गोलंदाजी क्रमवारी यादीत भारताची राधा यादव चौथ्या क्रमांकावर आहे. तर, दीप्ती शर्मा हिला 5व्या स्थानावर आहे.

याबरोबरच गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगन शट (Megan Schutt) 746 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माइल(Shabnim Ismail) (743) आणि इंग्लंडची  फिरकीपटू गोलंदाज सोफी एक्लस्टोन (Sophie Ecclestone) (734) गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

संघ क्रमवारीत 291 गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर, इंग्लंड(280) आणि न्यूझीलंड(274) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारत 262 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---