Women’sT20 World Cup 2024 :- आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या विश्वचषकासाठी सर्व संघांनी आपापल्या स्तरावर सामन्यांची तयारी सुरू केली आहे. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई येथे होईल. ज्यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेपूर्वी एकूण 10 सराव सामने खेळवले जाणार आहेत. हे सराव सामने 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होतील. हरमनप्रीत कौर सलग तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करेल.
प्रत्येक संघाला दोन सराव सामने खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये सर्व संघ आमनेसामने असतील. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या प्रतिस्पर्धी संघांशी मुकाबला करायचा आहे. सर्व दहा सराव सामने संध्याकाळी 7.30 पासून खेळवले जातील.
महिला टी20 विश्वचषक 2024 च्या सर्व सराव सामन्यांचे थेट प्रक्षेपण डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर केले जाईल. प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर संपूर्ण स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे.
भारतीय संघाकडे या विश्वचषकात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. भारतीय संघाने 2020 विश्वचषकात अंतिम फेरीत तर, मागील विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा बांगलादेशमधून स्थलांतरित करून युएई येथे होत आहे. मागील काही महिन्यात बांगलादेशमध्ये झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा इतरत्र हलवली गेली.
भारतीय संघ आपला पहिला सराव सामना 29 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडीजविरूद्ध खेळेल. हा सामना दुबई येथील आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2 येथे खेळला जाईल. तर, दुसरा सामना 1 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयसीसी अकादमी येथे होईल. भारतीय संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघाचे पूर्ण पथक:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.
महत्त्वाच्या बातम्या-
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं