भारताचा महिला विश्वचषक मोहिमेतील आजचा तिसरा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत आहे. पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड तर दुसऱ्या सामन्यात विंडीज संघाला पराभवाची धूळ चाखायला लावणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास जबरदस्त उंचावलेला आहे.
भारत पाकिस्तान यांच्यांतील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि हॉकी सामन्यांनंतर हा सामना होत असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामान्याकडे लागलं आहे. पहिल्यांदाच या महिला विश्वचषकाची चर्चा ही क्रिकेटप्रेमींमध्ये होत असल्या कारणाने भारत पाकिस्तान सामन्याला त्यात महत्त्व आले आहे.
भारताच्या खात्यात सध्या २ सामन्यात २ विजय असून भारत गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी आहे तर दोंन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे पाकिस्तान संघ शेवटच्या अर्थात ८व्या स्थानी आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका तर दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने पाकिस्तान संघाला पराभूत केलं आहे.
भारतीय महिला संघ- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव व नुझत परवीन.
पाकिस्तान महिला संघ- साना मीर (कर्णधार), अस्माविया इक्बाल, आयेशा झफर, डियाना बेग, गुलाम फातिमा, इराम जावेद, जव्हेरिया खान, कैनात इम्तियाझ, मरिना इक्बाल, नाहिदा खान, नैन अबिदी, नशरा संधू, सादिया युसुफ, सिद्रा नवाझ, वहीदा अख्तर व बिस्माह मारूफ.
कोणत्या मैदानावर होणार- कौंटी ग्राऊंड, डर्बी.
सामन्याची वेळ- भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजल्यापासून