भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) महिला संघात शनिवार रोजी (१९ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) १८ वा सामना झाला. ऑकलँडच्या ईडन पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांच्या गचाळ प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाने ३ चेंडू शिल्लक असतानाच ४ विकेट्सच्या नुकसानावर भारताचे लक्ष्य पूर्ण केले आणि ६ विकेट्स बाकी असताना सामना खिशात घातला.
ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी तर भारताची घसरण
हा सामना जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. हा त्यांचा विश्वचषकातील सलग पाचवा विजय होता. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम असून त्यांच्या खात्यात सर्वाधिक १० गुण आहेत. तसेच या विजयासह त्यांचा नेट रन रेट +१.२४२ झाला आहे.
तर भारतीय संघाचा हा विश्वचषकातील तिसरा पराभव होता. या पराभवासह त्यांच्या गुणांमध्ये आणि नेट रन रेटमध्येही घसरण झाली आहे. भारतीय संघ ४ गुण आणि +०.४५६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. आता त्यांना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी उर्वरित दोन्हीही सामने जिंकावे लागणार आहेत.
Australia become the first team to qualify for the semis after a six-wicket victory against India at Eden Park 👏
More 👉 https://t.co/bmWIYtt3iq#CWC22 pic.twitter.com/L9LuVwEqAm
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 19, 2022
दक्षिण आफ्रिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ ३ विजयांसह आणि ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ भारताच्या बरोबरीवर आहे. त्यांनीही आतापर्यंत २ सामने जिंकले असून त्यांच्याही खात्यात ४ गुणांची नोंद आहे. मात्र त्यांचा नेट रन रेट भारतापेक्षा कमी असल्यामुळे ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत.
त्यानंतर इंग्लंड आणि बांगलादेशचा संघ प्रत्येकी एका विजयासह गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान संघाला अद्याप विजयाचे खाते न खोलता आल्याने त्यांचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिला संघाची ‘या’ विक्रमात भारताच्या पुरुष संघाला टक्कर, केली बरोबरी
भारत वि. ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामन्यात खास ‘वर्ल्ड-रेकॉर्ड’, झाल्या चक्क ३ शतकी भागीदाऱ्या
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासाठी मिताली राजने या गोष्टीला धरले जबाबदार; म्हणाली…