---Advertisement---

महिला विश्वचषक: दिग्गजांकडून हळहळ आणि कौतुक

On: सोमवार, जुलै 24, 2017 10:06 AM
---Advertisement---

भारतीय महिला संघाला विश्वचषक अंतिम फेरीत रोमहर्षक सामन्यात निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या विश्वचषकावेळी भारतीय संघाला कधी नाही एवढा पाठिंबा मिळाला.

भारतीय क्रिकेट पाठीराख्याप्रमाणेच राजकीय, सामाजिक आणि बॉलीवूड क्षेत्रातील दिग्गजही या विश्वचषकाकडे आणि भारतीय संघाच्या कामगिरीकडे डोळे लावून बसले होते. त्यामुळे स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत दिग्गज संघाला पाठिंबा देत होते.

कालच्या सामन्यालाही भारतीय संघाला मोठा पाठिंबा मिळाला. परंतु पराभव झाल्यावर दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली तसेच भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला म्हणून कौतुकही केले.

यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, पंतप्रधान मोदी या दिग्गजांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment