आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील पहिला उपांत्य सामना बुधवारी (३० मार्च) वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात धडक देणार आहे. मात्र, त्यापूर्वीच वेस्ट इंडिज संघाला धक्का बसला आहे. संघातील अनुभवी खेळाडू ऍफी फ्लेचरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड येथे राखीव खेळाडू म्हणून असलेली अष्टपैलू मँडी मंगरूला (Mandy Mangru) फ्लेचरच्या जागी बदली खेळाडू म्हणून ताफ्यात घेतले आहे. फ्लेचरच्या अनुपस्थितीमुळे शक्तिशाली ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध वेस्ट इंडिजचे गोलंदाजीचे पर्याय कमी झाले आहेत. वेस्ट इंडिज संघाने ५८ वनडे सामन्यांचा अनुभव असलेल्या फ्लेचरला गमावले आहे.
ऍफी फ्लेचरने (Afy Fletcher) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात (ICC Women World Cup) ३ सामने खेळताना सामन्यांतून ४ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध तिने माऊंट माऊंगनुई येथे खेळताना १० षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. मंगरूने वेस्ट इंडिजसाठी फक्त एक वनडे सामना खेळला आहे आणि गेल्या महिन्यात जोहान्सबर्ग येथे तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात वेस्ट इंडिजने सामना जिंकला होता.
वेस्ट इंडिजच्या २२ वर्षीय खेळाडूने यावेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५ धावा केल्या होत्या. तिने ३ षटके गोलंदाजी करताना फक्त ८ धावा दिल्या होत्या.
फ्लेचरची कारकीर्द
फ्लेचरने ५८ वनडे सामने आणि ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिने वनडेत ३.९९च्या इकॉनॉमी रेटने ६६ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे तिने टी२०त ५.८८च्या इकॉनॉमी रेटने ४३ विकेट्स घेतल्या आहेत.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील दुसरा उपांत्य सामना ३१ मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात पहिल्या उपांत्य सामन्यातील विजयी संघाशी दोन हात करेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर
“आमच्यासाठी तोच बेबी एबी”, केएल राहुलकडून २२ वर्षीय भारतीय युवा खेळाडूचे कौतुक
‘तेवतिया म्हणजे क्रांती, समोरच्या टीममध्ये अशांती’, मॅचविनरचे कौतुक करताना ‘हा’ दिग्गज बनला कवी