आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मधील १७ वा सामना बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ९ बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १३६ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी वेस्ट इंडिजने ४ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या फिरकी गोलंदाज ऍफी फ्लेचर हिने अनोखे सेलिब्रेशन करत सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
फ्लेचरने बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर नव्या प्रकारचे बेबी सेलिब्रेशन (New Baby Celebration) केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महिला वनडे विश्वचषकात (Women ODI World Cup 2022) वेगवेगळ्या देशांच्या अशा खेळाडूंनी भाग घेतला आहे, ज्या नुकत्याच आई बनल्या आहेत. पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिसमाह मरूफ हिने काही दिवसांपूर्वीच विश्वचषक सामन्यात अर्धशतक केल्यानंतर ख्रिस गेल आणि विराट कोहलीप्रमाणे बेबी सेलिब्रेशन केले होते. परंतु आता वेस्ट इंडिजच्या फ्लेचरने (Afy Fletcher) एकदम वेगळ्या पद्धतीने बेबी सेलिब्रेशन केले आहे.
त्याचे झाले असे की, वेस्ट इंडिजच्या १४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशकडून फरगाना हौकी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. ती २३ धावांवर खेळत असताना फ्लेचरने सरळ तिच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर लगेचच तिने हाताने नंबर डायल करत असल्याची कृती केली. पुढे व्हिडिओ कॉल करून आपल्या लहानग्या बाळाला ‘हाय बेबी’ असे म्हणत असल्याची कृती केली.
https://www.instagram.com/reel/CbOtst2F7FW/?utm_source=ig_web_copy_link
तिच्या या अनोख्या सेलिब्रेशनला पाहून समालोचकही भलतेच खुश झाले. त्यांनी तिच्या सेलिब्रेशनचे कौतुकही केले. फ्लेचर काही महिन्यांपूर्वीच आई बनली आहे. तिचा मुलगा ७ महिन्यांचा आहे.
पाकिस्तानी कर्णधारानेही केले होते बेबी सेलिब्रेशन
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी कर्णधार मरूफने अर्धशतक केल्यानंतर तिच्या मुलीसाठी बेबी सेलिब्रेशन केले होते. तिने यंदाच्या विश्वचषकातील तिचे पहिले अर्धशतक (Misbah Maroof Half Century) पूर्ण केल्यानंतर आनंदाने सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या तिच्या आई आणि मुलीसाठी सेलिब्रेशन केले. तिने अर्धशतकानंतर हातातील बॅट खाली ठेवत दोन्ही हात जोडून बाळाला खेळवत असल्याचे विशेष सेलिब्रेशन (Misbah Maroof Baby Celebration) केले. आयसीसीने तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली( Virat Kohli) ही त्याची मुलगी, वामिकासाठी असे सेलिब्रेशन करताना दिसला होता.
चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रोहितने घेतले ५३,२६१ रिटेक्स, धमाल पाहून पोट धरून हसाल
‘टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे’, पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधाराचे झाले दणक्यात स्वागत, पाहा व्हिडिओ
आयपीएल २०२२पूर्वी राजस्थान संघात सामील झाला ‘हा’ रॉयल खेळाडू; चहलसोबत ओपनिंग करण्यावर म्हणाला…