न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ सुरू आहे. महिला विश्वचषकात वेस्ट इंडीज संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने यजमान न्यूझीलंडला पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारली आहे. दुसऱ्या सामन्यात ९ मार्च रोजी वेस्ट इंडीजने इंग्लंडला ७ धावांनी पराभूत केले आहे. वेस्ट इंडीजच्या फलंदाजीवेळी १२ व्या षटकात इंग्लंडची वेगवान गोलंदाज केट क्रॉस हिने एक सोपा आणि महत्वाचा झेल सोडला. नंतर हा झेल इंग्लंडला महागात पडला.
हा सामना यूनिवर्सिटी ओवल, डुनेडिनमध्ये खेळला गेला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत वेस्ट इंडीजने मर्यादित ५० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या. डावाच्या १२ व्या षटकात हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) फलंदाजी करत होती आणि समोर गोलंदाजाह होती केट क्रॉस (Kate Cross). षटकातील एक चेंडू क्रॉसने संथ गतीने टाकला आणि यावर मॅथ्यूजने क्रॉसच्या हातात सोपा झेल दिला होता, पण क्रॉसने हा झेल सोडला.
त्यानंतर क्रॉसने टाकलेल्या पुढच्याच चेंडूवर मॅथ्यूने कसलाही विचार न करता गोलंदाजाच्या डोक्यावरून जबरदस्त षटकार मारला. या षटकाराने क्रॉसच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. आयसीसीने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आयसीसीने लिहिले की, ‘ड्रॉप कॅचनंतर षटकार. इंग्लंडच्या जखमेवर खरोखरच मीठ चोळले गेले.’
व्हिडिओ शेअर केला गेल्यानंतर काहीच वेळात लाखो लोकांनी तो पाहिला आणि मोठ्या प्रमाणात लाइक्स दिल्या. काही चाहत्यांनी लिहिले की, क्रॉसने जर झेल एका हाताने घेतला असता, तर पकडता आला असता.
https://www.instagram.com/reel/Ca3FAnPBu70/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने ६ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ २१८ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी वेस्ट इंडीजने ७ धावांनी विजय मिळवला. महिला विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध विजय मिळला आहे. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी संथ गतीने धावा केल्या, पण गोलंदाजांनी त्याची कमी भरून काढली.
महत्वाच्या बातम्या –
शेन वॉर्नने मृत्यूच्या चार तास आधी ज्यांची भेट घेतली, ते परशुराम पांडे आहेत तरी कोण?
अखेर राहुल चहर चढला बोहल्यावर! २२ व्या वर्षी बांधली लग्नगाठ
एका वादग्रस्त कारकिर्दीची अखेर! श्रीसंतची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती





