भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू राहुल चहर (Rahul Chahar) बुधवारी (९ मार्च) गोवा येथे विवाह बंधनात अडकला. त्याने आपली मैत्रीण फॅशन डिझाईनर ईशानी जोहर हिच्याशी लग्नगाठ बांधली (Rahul Chahar Marriage). दोघांनीही २०१९ मध्ये साखरपुडा केला होता. या दोघांनी लग्नाचे रिसेप्शन १२ मार्च रोजी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने स्वतः इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
राहुल गोवा येथे काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. या डेस्टिनेशन वेडिंगपूर्वी इतर पारंपरिक विधी पार पडले होते. तसेच, मागील दोन दिवसांपासून तो सातत्याने आपली वाग्दत्त वधू ईशानी हिच्यासोबतची छायाचित्रे व प्री-वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. त्याचा चुलत भाऊ व भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर हा देखील गोव्याला पोहोचल्याचे सांगण्यात आले.
अशी राहिली आहे का कारकीर्द
राहुल चाहरने भारतीय संघासाठी आत्तापर्यंत १ एकदिवसीय सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ५४ धावा देत ३ विकेट घेतल्या आहेत. २३ जूलै २०२१ रोजी श्रीलंका संघाविरुद्ध त्याने हा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारताच्या एकदिवसीय संघात अजूनही स्थान दिले नाही. तसेच तो भारतासाठी ६ टी२० सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ७ विकेट घेतल्या आहेत. तो २०१९ वर्षापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने या टी२० लीगमध्ये ४२ सामन्यांत ४३ विकेट घेतल्य़ा आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी २७ धावा देत ४ विकेट घेतलेली होती. त्याला २०२२ च्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्सने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात (mahasports.in)
महिला विश्वचषकात ‘मिताली सेना’ भिडणार यजमान न्यूझीलंडशी; अव्वल स्थानाचे असेल लक्ष (mahasports.in)