मागील जवळ जवळ 10 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. त्यांच्यावर मागीलवर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणामुळे एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ संघर्ष करताना दिसून येत आहे. पण या दोघांचीही बंदी 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाआधी संपत असल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता स्मिथ या विश्वचषकाला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याला बांगलादेश प्रीमीयर लीगममध्ये खेळताना 11 जानेवारी 2019 ला हाताच्या कोपऱ्याची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याला सहा आठवड्यांची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. त्यामुळे या विश्रांतीनंतर त्याचा पुन्हा सराव सुरु होणार आहे. त्यामुळेच त्याला विश्वचषकाला मुकावे लागू शकते.
याबद्दल इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया विश्वचषका ऐवजी ऍशेस मालिकेत स्मिथच्या पुनरागमनावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे तो या दुखापतीतून सावरताना ऑस्ट्रेलिया अ कडून क्रिकेट खेळेल. जेणेकरुन तो विश्वचषकानंतर ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ऍशेस मालिकेपर्यंत दुखापतीतून पुर्णपणे सावरलेला असेल.
यामुळे स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यालाही मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या आयपीएलमधील सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनीही अप्रत्यक्षपणे हे सुचवले आहे. ते म्हणाले, ‘ आम्ही दोन महान खेळाडूंबद्दल (स्मिथ आणि वॉर्नर) बोलत आहोत. या दोन खेळाडूंचे नाव जर पेपरवर असेल आणि तरी त्यांना संघात न घेणे हा मुर्खपणा आहे. त्यांना विश्वचषकाआधी किती सामने खेळायला मिळणार हे पहावे लागणार आहे. ते संधी शोधतील, आम्हीही संधी शोधू, पण मी आत्ता काहीही सांगू शकत नाही.’
‘वैयक्तिक खेळाडूपेक्षा संघासाठी काय योग्य आहे यावर आम्हाला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. आम्हाला विश्वचषक जिंकण्यासाठी जायचे आहे.’
स्मिथच्या विश्वचषकातील समावेशाबाबत जरी प्रश्नचिन्ह असले तरी वॉर्नर विश्वचषकात खेळण्याची शक्यता दाट आहे. 29 मार्चपर्यंत वॉर्नरची बंदी संपणार असल्याने आणि त्याच दरम्यान ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेतही वॉर्नरला संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीपासून वाचण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना दिला हा खास सल्ला
–पंड्यावर कडाडून टीका करणारा दिग्गज क्रिकेटपटू आता करतोय त्याचेच कौतुक
–एकेकाळी यो-यो टेस्टही पास न होणारा खेळाडू झाला टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू






