क्रिकेट विश्वचषक 2023 या महाकुंभमेळ्यातील 23 सामने पार पडले आहेत. यामध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले. बलाढ्य संघ दुबळ्या संघांकडून पराभूत झाले. पॉईंट्स टेबलमध्ये प्रत्येक सामन्यानंतर मोठे बदल होतायेत. अशात स्पर्धेतील 24वा सामना बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. मात्र, नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमवत सर्व संघांना उलटफेरच्या रूपात चेतावणी दिली आहे. चला तर, या सामन्याविषयी सर्व काही जाणून घेऊयात…
ऑस्ट्रेलिया संघाने त्यांचे मागील दोन्ही सामने जिंकले आहे, तर नेदरलँड्सने आफ्रिकेविरुद्ध जिंकल्यानंतर श्रीलंकेविरुद्धचा मागील सामना गमावला आहे. विश्वचषकात हे दोन्ही संघ आतापर्यंत फक्त 2 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाच वरचढ ठरला आहे. 2003 आणि 2007मध्ये ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे 75 आणि 229 धावांनी विजय मिळवला होता. याव्यतिरिक्त दोन्ही संघांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये आमना-सामना झाला नाहीये. ऑस्ट्रेलियात डावखुऱ्या हाताचा फलंदाज ट्रेविस हेड याचे पुनरागमन झाले आहे. तसेच, नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो.
खेळपट्टी आणि हवामान
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम (Arun Jaitley Stadium) येथील खेळपट्टी धिम्या आणि फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. मात्र, मागील 3 सामन्यात सरासरी 270 हून अधिक धावसंख्या बनली जात आहे. मात्र, सायंकाळी दव पाहायला मिळेल आणि थोडी थंडीही असेल. यामध्ये वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला संधी मिळेल आणि नंतर फलंदाजांसाठी फलंदाजी करणे सोपे होऊ शकते.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेकीची वेळ 1.30 आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येऊ शकतो. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (icc world cup 2023 aus vs ned 24th match preview predicted xi weather and live stream read)
संभावित प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेजलवूड.
नेदरलँड्स
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डोड, तेजा निदिमानुरु, बास डी लीड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, पॉल व्हॅन मीकेरेन, आर्यन दत्त
हेही वाचा-
विजय आफ्रिकेचा, पण नुकसान न्यूझीलंडचे, Points Tableमध्ये मोठा बदल; इंग्लंड कुठंय पाहा
‘सेमीफायनलमध्ये पोहोचलो नाही, तर…’, दारुण पराभवानंतर खचला शाकिब, ‘या’ 3 संघांना म्हणाला दावेदार