बुधवारी (15 नोव्हेंबर) आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना मुंबईतील वानखडे स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या शानदार विजयाच्या जोरावर मेन इन ब्लू संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा शानदार सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती मैदानावर उपस्थित होत्या. त्यापैकी एक होता इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम. सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याची खास भेट घेतली, ज्याचा एक सुंदर व्हिडिओही समोर आला आहे.
माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम (David Beckham) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. युनिसेफचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून त्यानी उपांत्य फेरीच्या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. सामन्यापूर्वी त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत दोन्ही संघातील खेळाडूंची भेट घेतली. या सामन्यानंतर हिटमॅन त्याच्या आवडत्या फुटबॉलपटूला भेटला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपली जर्सीही बेकहॅमला दिली. दुसरीकडे, बेकहॅमने त्याची रिअल माद्रिदची जर्सी हिटमॅनला दिली. दोन्ही दिग्गज एकमेकांची जर्सी घालून पोज देताना दिसले. त्याचवेळी बेकहॅमने रोहितला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
David Beckham wishing all the best for the finals to Captain Rohit Sharma.
– A legendary meet up. 🎯pic.twitter.com/RzNLCpa7yF
— Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2023
David Beckham wearing Rohit Sharma's Indian Team Jersey.
Rohit Sharma wearing David Beckham's Real Madrid Jersey. pic.twitter.com/dfloBKDBvl
— Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2023
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (117) आणि श्रेयस अय्यर (105) यांच्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्स गमावून 397 धावा केल्या. किंग कोहलीचे वनडे कारकिर्दीतील हे 50 वे शतक होते.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकांत 327 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद शमी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 9.5 षटकात 57 धावांत सात विकेट्स घेतल्या. शमीने या विश्वचषकात तीनवेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. (Beckham-Rohit swap jerseys Beckham wishes Hitman all the best for the finals watch the video)
म्हत्वाच्या बातम्या
दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद
पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला तिहेरी मुकुट